हिंदू राष्ट्रासाठी दहशतवादाचा कट, सनातनवर एटीएसकडून ठपका

| Updated on: Jul 05, 2019 | 4:54 PM

मुंबई : नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच एटीएसतर्फे अत्यंत खळबळजनक आरोप सनातन संस्थेवर लावण्यात आले  आहेत. हिंदू राष्ट्रासाठी दहशतवाद घडवण्याचा कट अटक केलेल्या आरोपींनी रचला असून सनातन संस्थेच्या ‘क्षात्रधर्म साधना’ या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, हिंदू राष्ट्रनिर्मितीसाठी दहशतवाद घडवण्यासोबतच इतर कारवाया केल्याचं समोर आलंय. नालासोपारा अवैध्य शस्त्रसाठा प्रकरणी सनातनवर करण्यात आलेले आरोप हे अत्यंत […]

हिंदू राष्ट्रासाठी दहशतवादाचा कट, सनातनवर एटीएसकडून ठपका
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

मुंबई : नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच एटीएसतर्फे अत्यंत खळबळजनक आरोप सनातन संस्थेवर लावण्यात आले  आहेत. हिंदू राष्ट्रासाठी दहशतवाद घडवण्याचा कट अटक केलेल्या आरोपींनी रचला असून सनातन संस्थेच्या ‘क्षात्रधर्म साधना’ या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, हिंदू राष्ट्रनिर्मितीसाठी दहशतवाद घडवण्यासोबतच इतर कारवाया केल्याचं समोर आलंय.

नालासोपारा अवैध्य शस्त्रसाठा प्रकरणी सनातनवर करण्यात आलेले आरोप हे अत्यंत गंभीर आहेत. एटीएसने याबाबत विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. आरोपी वैभव राऊतसह अन्य 11 जणांविरोधात सहा हजार पानांचं हे आरोपपत्र आहे. आरोपी हे सनातन संस्था, हिंदू जनजागृती समितीचे सदस्य आहेत. सनातनच्या ‘क्षात्रधर्म साधना’ नावाच्या पुस्तकात नमूद केलेल्या हिंदू राष्ट्र निर्मितीच्या उद्देशाने प्रेरित होऊन दहशतवादी कारवाया केल्याचं आरोपपत्रात नमूद करण्यात आलंय.

आरोपींकडून 23 जिवंत गावठी बॉम्ब, 15 पिस्तुल, एक गावठी कट्टा, 26 डेटोनेटर्स जप्त करण्यात आले आहेत. विचारवंत आणि सन बर्न फेस्टिव्हल आरोपींच्या निशाण्यावर होतं. एटीएसने बुधवारी विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात 186 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

10 ऑगस्ट 2018 रोजी एटीएसने छापे टाकले होते. यात मोठ्या प्रमाणावर दडविलेला शस्त्रसाठा एटीएसच्या हाती लागला. या प्रकरणी पोलिसांनी वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर आणि नालासोपाऱ्याचा रहिवासी शरद कळसकर यांना ऑगस्टमध्ये अटक केली होती. एका घरात अवैध पद्धतीने शस्त्रांचा साठा बाळगल्याप्रकरणी अटकेत असलेल्या वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांच्यावर एटीएसने आर्म्स अ‍ॅक्टनुसार बेकायदा कृत्ये (प्रतिबंध) कायद्यानुसार (यूएपीए) हे दोषारोपपत्र दाखल केलं आहे.

संपूर्ण प्रकरण विशेष न्यायालयात आहे. आरोपपत्रही दाखल झालंय. मात्र संस्थेवर लावण्यात आलेले आरोप हे राजकीय हेतून प्रेरित असल्याचा दावा सनातनच्या वकिलांनी केलाय. एटीएसने लावलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. त्यामुळे सनातनवर काय कारवाई होणार आणि सरकार काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलंय.