“तात्याराव लहाने, मन मोठं करा, हुकूमशाही सोडा, हॉस्पिटल की निवासी डॉक्टरांची छळछावणी?”

| Updated on: Jun 02, 2023 | 7:42 PM

ज्येष्ठ नेत्रविकार तज्ज्ञ, पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांच्या अडचणी सतत वाढत आहेत, त्यांच्याविरोधात २८ निवासी डॉक्टरांनी आंदोलन सुरुच ठेवलं आहे. एकीकडे या युवा डॉक्टरांचं कौतुक होत असताना, डॉ. संग्राम पाटील यांनी परदेशातून त्यांच्यावर टीकेची क्षेपणास्त्रच डागली आहेत, पाहा काय आहेत लहाने यांच्यावरील गंभीर आरोप.

तात्याराव लहाने, मन मोठं करा, हुकूमशाही सोडा, हॉस्पिटल की निवासी डॉक्टरांची छळछावणी?
Follow us on

मुंबई : नेत्रविकार तज्ज्ञ अशी ओळख असलेले, सध्या जे.जे. हॉस्पिटलच्या नेत्र विभासाठी निवृत्तीनंतरही काम करणारे, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने हे सध्या वादात आले आहेत, डॉ.रागिनी पारेख त्यांच्याविरोधात २८ निवासी डॉक्टरांनी तक्रार केल्या आहेत. यानंतर डॉ.तात्याराव लहाने यांनी राजीनामा दिला आहे. मात्र तात्याराव लहाने कसे होते, कसे आहेत, हे आरोप सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जेजे हॉस्पिटलमधील लॉ़बिंग या निमित्ताने चर्चेला आलेली आहे. जेजे हॉस्पिटल हे अत्यंत नामांकित हॉस्पिटल आहे, ते राज्य शासनाकडून चालवलं जातं.

पण या सततच्या वर्षानुवर्ष चाललेल्या लॉबिंगुमळे जे जे हॉस्पिटलच्या रुग्णांचं आणि निवासी डॉक्टरांचं मोठं नुकसान झालं आहे. डॉ. संग्राम पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत, त्यात त्यांनी डॉ. लहाने यांच्या चुकांचा आणि हुकूमशाहीचा पाढाच वाचला आहे.

डॉ.संग्राम पाटील यांचे डॉ.तात्याराव लहाने यांच्यावर आरोप

या व्हिडीओत डॉ. संग्राम पाटील यांनी डॉ. लहाने यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत, डॉ.लहाने हे जे जे हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा छळ करतात. जेजे हॉस्पिटलचा नेत्ररोगविभाग ही एक छळ छावणी झाली आहे. डॉ. लहाने हे निवृत्त झाले आहेत, तरी देखील त्यांच्याकडून नेत्रविभागाची धुरा सोडली जात नाहीय.

डॉ.लहाने यांचे राजकारणात लागेबांधे आहेत, गिरीश महाजन यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. एवढंच नाही कोणतंही सरकार आलं, तर त्या-त्या सरकारमध्ये त्यांचे लागेबांधे आहेत, लहाने यांची सेवा नेहमीच विस्तारली जाते, असा आरोप डॉ. संग्राम पाटील यांनी केला आहे.

नेत्ररोग विभागात जे निवासी डॉक्टर शिक्षण घेतात, त्या निवासी डॉक्टरांची डोळ्यांच्या ऑपरेशनची प्रॅक्टीस होणे अतिशय महत्त्वाचे आहे, पण काही निवासी डॉक्टर्सना वर्षातून दोन-दोन देखील ऑपरेशन करायला मिळत नाहीत. माझ्या बायकोचा हा अनुभव असल्याचं उदाहरण देखील डॉ.संग्राम पाटील यांनी दिले आहे.

मोठ्याचा मुलगा, राजकारण्याचा मुलगा यांना जास्त ऑपरेशन मिळतात, इतर निवासी डॉक्टर मात्र ऑपरेशन टेबलाच्या आजूबाजूला तोंड ताणत फिरत असतात.ट्रेनिंगच्या नावाने हे फिरतात,जेजेमध्ये अनेक निवासी डॉक्टर असे आहेत, ज्यांना डोळ्यांची ऑपरेशन करायला मिळत नाहीत. यानंतर त्यांना बाहेर ऑपरेशनची प्रॅक्टीस करण्यासाठी संघर्ष करावा लागतो.

निवासी डॉक्टरांना सर्वांसमोर शिव्या घातल्या जातात. निवासी डॉक्टरांचा छळ केला जातो. रजनी पारेख यांच्या या आधी झालेल्या चुका फेस करण्यासाठी लहाने पुढे आले आहेत. लहाने पुढे पुढे करतायत, लहाने यांना महात्मा म्हणून मीडिया दाखवते. आपले संबंध चांगले रहावेत म्हणून राजकारण्यांना खुश ठेवण्यासाठी ही कायम बेकायदेशीर कामं करत असतात. हे निवासी डॉक्टरांची सर्जरी खाणारे सर्जरी भक्षक झाले आहेत, असे गंभीर आरोप डॉ.संग्राम पाटील यांनी केले आहेत.