गजानन कीर्तीकर यांना 2024 मध्ये तिकीट तर मिळणार का..? राजीनाम्यासाठी थेट बाईक रॅलीच काढलेय…

| Updated on: Nov 16, 2022 | 12:02 AM

ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या गजानन कीर्तीकर यांनी मतदारांना अपमान केला आहे, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता संजय निरुपम यांनी केली आहे.

गजानन कीर्तीकर यांना 2024 मध्ये तिकीट तर मिळणार का..? राजीनाम्यासाठी थेट बाईक रॅलीच काढलेय...
Follow us on

मुंबईः गजानन कीर्तीकर यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा यासाठी काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली “बाईक रॅली”चे आयोजन करण्यात आले आहे. संजय निरुपम यांनी कीर्तीकर यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, खासदार गजानन कीर्तीकर यांनी नुकताच बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे कीर्तीकर यांचा हा पक्षप्रवेश म्हणजे उत्तर पश्चिम-मुंबई मतदार संघातील मतदारांचा अपमान असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

त्यामुळे गजानन किर्तीकर यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, याकरिता उत्तर पश्चिम जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे “बाईक रॅली”चे आयोजन करण्यात आलेले आहे.

बाकीचे नेते माझ्या मतदारसंघात येत नाहीत, त्यामुळे मी त्यांच्याकडे काही राजीनामा मागत नाही असंही त्यांनी स्पष्ट केले.

2024 मध्ये गजानन कीर्तीकर कुठे असतील, ते माहिती नाही. आधी ते उभे राहतील की नाही ते पाहा, त्यांना तिकीट मिळेल की नाही, तेही माहीत नाही असाही टोला त्यांनी कीर्तीकर यांना लगावला.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर झालेल्या आरोपाबद्दल मी जास्त काही बोलणार नाही. कारण नाहीतर कोणीतरी माझ्यावर विनयभंगाचा आरोप करेल असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे.

ठाकरे गटात असलेले खासदार गजानन कीर्तीकर ज्या दिवसांपासून ते शिंदे गटात सामील झाले आहेत. त्या दिवसांपासून संजय निरुपम यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

संजय निरुपम यांनी गजानन कीर्तीकर यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले की, कीर्तीकर यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्यामुळे त्यांनी येथील मतदारांचा अपमान केला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मतदारांचा अपमान केल्यामुळेच त्यांनी राजीनामा द्यावा अशी टीका त्याच्यावर करण्यात आली आहे.