जेव्हा योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल. पण सध्या ती योग्य वेळ नाही, असं राहुल गांधी अमेरिकेतील एका कार्यक्रमात काल म्हणाले होते. त्यावर त्यांचे माजी सहकारी, माजी काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी भाष्य केलं आहे. राहुल गांधी यांनी अमेरिकेत वक्तव्य केले आहे. भारत जेव्हा न्याय ठिक होईल तेव्हा ते आरक्षण संपवतील, यावरून त्यांची मानसिकता समजते. काँग्रेस पक्ष आरक्षणविरोधी आहे, हे स्पष्ट झाले आहे.महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचे राजकारण करतात ते राहुल गांधींच्या या विधानाशी सहमत आहेत का? महाराष्ट्रात आरक्षण हा मोठा प्रश्न आहे, मराठा समाज आरक्षणासाठी लढत आहे. अशा स्थितीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना राहुल गांधींच्या वक्तव्याशी सहमत आहे का, हा प्रश्न आहे, असं संजय निरूपम म्हणालेत.
1978 मध्ये मंडल समिती स्थापन झाली. काँग्रेसने 10 वर्षे मंडल आयोग रिपोर्ट लागू केला नाही. मंडल आयोगाचा अहवाल1979 मध्ये लागू झाला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजप आणि एनडीएवर खोटे आरोप केले. राहुल गांधी यांनी परदेशी भूमीवर जाऊन भारताविरोधात बोलू नये, असंही संजय निरूपम म्हणालेत.
राहुल गांधी यांनी भारतविरोधी अमेरिकन खासदाराचीही भेट घेतली आहे. काही अमेरिकन खासदार काश्मीरबाबत भारताच्या हिताच्या विरोधात प्रचार करतात. बांग्लादेशात जे काही झाले ते आरक्षणाच्या विरोधात झाले. आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशातील तरुण भडकले. काँग्रेस पक्ष भारतात आरक्षणाच्या विरोधात असे काही षडयंत्र करत आहे का? कारण राहुल गांधी अशा लोकांना अमेरिकेत भेटत आले आहेत. राहुल गांधी यांनी सुराणी महिलेची भेट घेतली आहे. ती जगातील मुस्लिम देशांची प्रिय आहे, असंही निरूपम म्हणालेत.
महाराष्ट्रात निवडणुकीचा टप्पा सुरू झाला आहे. त्यामुळे असे सर्वे येतच राहतील, बहुतांश सर्वे बनावट आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळत आहे. लाडकी बहीण योजनेवर उद्धव ठाकरेंच्या नेत्यांची शंका व्यक्त केले आहेत, असंही संजय निरूपण म्हणालेत.