मुंबई : मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांची बदली झाली आहे. त्यामुळं त्यांच्या जागी वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय पांडे (Sanjay Pandey) यांची मुंबई पोलीस (Mumbai Police) आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार देण्यात आला होता. आता संजय पांडे यांच्यावर मुंबई पोलीस दलाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबई पोलीस दल आता संजय पांडे यांच्या नेतृत्त्वात काम करेल. महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी यापूर्वी संजय पांडे यांच्याकडे होती. त्यांच्या जागी रजनीश शेठ यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळं संजय पांडे यांच्याकडे आता दुसरी जबाबदारी देण्यात आली आहे. राज्य सरकारनं त्यांना मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्त केलं आहे.
संजय पांडे हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी असून नुकत्यात झालेल्या बदलीमुळे ते राज्य सरकारवर नाराज होते. संजय पांडे हे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन परमबीर सिंह यांची होमगार्डच्या प्रमुखपदी वर्णी लागल्याने संजय पांडे यांना तुलनेने कमी महत्त्वाच्या असणाऱ्या राज्य सुरक्षा महामंडळाच्या प्रमुखपदी नेमण्यात आले, त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. संजय पांडे यांच्या नाराजीनंतर त्यांना महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती देण्यात आली होती.
राज्य सरकारनं संजय पांडे यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबईच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरुन मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून बदली केली आहे. तर, हेमंत नगराळे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरुन महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबईच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती केलीय.
संजय पांडे यांनी 21 मे 2021 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंदर्भातलं पत्र लिहिलं होतं. पोलीस महासंचालकपद किंवा मुंबई पोलीस आयुक्तपद रिक्त झाले असतानाही संधी देण्यात आली नाही, असं त्यांनी पत्रात म्हटलं होतं. याउलट माझ्या कनिष्ठ अधिकाऱ्याला ते पद देण्यात आले, अशी खंत संजय पांडे यांनी व्यक्त केली होती. या पत्रात संजय पांडे यांनी परमबीर सिंह यांच्यावरही ताशेरे ओढले होते. परमबीर सिंह यांचे काम व्यवस्थित नाही. त्यांनी आपल्याला एका प्रकरणाच्या तपासात सहकार्य न केल्याचेही संजय पांडे यांनी बोलून दाखवले होते.
Onion : कांदा दराचा लहरीपणा, एका रात्रीतून असे काय दर घसरले की, व्यापारीही चक्रावले
Nanded | Banjara संस्कृती जोपासण्यासाठी Kinwatच्या सारखणीत लेंगी स्पर्धा