मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काही योजनांचा शुभारंभ आणि भूमिपूजनही होणार आहे. पण त्याआधी ठाकरे गट आणि भाजपचे नेते आमनेसामने आले आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी मुंबईत येण्याआधीच राज्यात राजकीय युद्ध मात्र जोरात सुरू झाले आहे. महिन्याभरात दुसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येत आहेत. नागपूर नंतर मोदी आता राजधानी मुंबईत येत आहेत.यावेळी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटनं आणि भूमिपूजनं केली जाणार आहेत. त्यानंतर बीकेसी मैदानात मोदी यांची सभा होणार आहे.
त्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून जंगी तयारीही करण्यात आली आहे. पण मोदी मुंबईत येण्याआधीच, ठाकरे गट भाजप आमनेसामने आली आहे. आमच्याच कामाचं उद्घाटन मोदी करत आहेत,
तर संजय राऊत यांनी मात्र आमच्या काळातील कामाचं उद्घाटन ते करत असल्याचा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे. तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र उद्धव ठाकरेंच्या काळातलं एकही काम झालं नाही असं त्यांनी सांगितले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मेट्रो 2 अ, आणि मेट्रो 7 च्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन त्यांट्या हस्ते होणार आहे. 1 हजार 750 कोटी रुपये खर्चून मुंबईचं सौंदर्यीकरण करण्यात येतं आहे तर त्या 500 हून अधिक कामांचं भूमिपूजनही नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
आपली चिकित्सा योजने अंतर्गत भांडूप सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, ओशिवरा प्रसुतीगृह, गोरेगाव सिद्धार्थ रुग्णालयांचं पुनर्विकासाचे काम पूर्ण झालं आहे,
त्याचंही उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार 26 हजार कोटींचे 7 मलनिस्सारण प्लांट, 400 किलोमीटरच्या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ मोदींच्या हस्ते होणार आहे. तर एक लाख फेरीवाल्यांना पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत 10 हजार रुपये कर्ज योजेनाही सुरु होणार आहे.
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या कामांचं भूमिपूजन होणार आहे. त्यातलं एक महत्वाचं काम म्हणजे, मुंबईतले 400 किलोमीटरचे सिमेंट क्राँक्रिटचे रस्ते. आदित्य ठाकरे यांनी याच 6 हजार कोटींच्या कामावरुन शिंदे-फडणवीसांवर शंका उपस्थित केली आहे.
तर त्या टीकेला उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर देताना त्यांची.टक्केवारी आणि दुकानदारीच बंद होत असल्यानं ओरड सुरु असल्याची खोचक टीका त्यांनी केली आहे. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपनं गेल्या सप्टेंबर महिन्यातच मिशन 150 सुरु केलं आहे.
मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर बसवणारच, असा भाजपचा निर्धार आहे तर मुंबई महापालिकेत शिवसेनेची 25 वर्षांपासून सत्ता आहे, पण यावेळी भाजपनं कंबर कसली आहे.
त्यासाठीच मुंबईकरांना नव्या सोयी सुविधांबरोबरच नवी कामं हाती घेऊन मेसेज दिला जातो आहे. ऐन निवडणुकीआधी पंतप्रधान मोदींना मुंबईत बोलावून वातावरण निर्मिती करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.