नागपूरमधील हिट अँड रन प्रकरणात विरोधकांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. संकेत बावनकुळे याला पोलीस वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. आता बीफ प्रकरणावरून विरोधकांनी पुन्हा मोर्चा उघडला आहे. संजय राऊत यांनी याप्रकरणात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ज्या देशात इलेक्ट्रॉनिक मशीनमधील मतं बदलल्या जाऊ शकतात, तिथं काही पण होऊ शकतं असा टोला राऊत यांनी लगावला.
कौटुंबिक यातना भाजपला कळतील
आम्ही चंद्रशेखर बावनकुळे यांना दोष देत नाही. पण भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत आपल्या विरोधकांच्या कुटुंबावर खास करून ज्या पद्धतीने खोटे दळभद्री आरोप करून त्रास देण्याचा प्रयत्न केला तुरुंगात पाठवले. आज तीच परिस्थिती भारतीय जनता च्या पक्षाच्या काही नेत्यांवरती आली आहे. त्यांच्यामुळे कौटुंबिक यातना काय असतात हे भारतीय जनता पक्षाला हळूहळू कळत जाईल. शहा राजकारण, राजकीय बदल्यांच राजकारण कुटुंबियापर्यंत पोचू नये या मताचे आम्ही आहोत. पण हे संस्कृती तोडण्याचं काम केले भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात… खास करून देवेंद्र फडणीस यांच्या हाती राज्याचे सूत्र गेल्यावर, असा आरोप राऊत यांनी केला.
बिल जप्त करायला इतका उशीर का?
त्या गाडीत बिल मिळाले असं समाज माध्यमावर सर्वत्र चर्चा आहे आणि त्या बिलामध्ये बीफचा उल्लेख होता. पोलिसांना बिल जप्त करायला आणि बिल काढायला चार दिवस का लागले? गाडीची नंबर प्लेट बदलण्यात आली. पोलीस त्यावरती बोलत नाही. गाडी कोणाची याचे FIR मध्ये उल्लेख नाही. गाडीतील मेडिकल रिपोट त्यात उल्लेख नाही. या सगळ्या गोष्टींविषयी पोलीस सारवा सारव करत असल्याचा आरोप राऊतांनी केला.
या देशात काहीही होऊ शकतं
मात्र बीपचा उल्लेख आल्यावर पोलीस पुढे येऊन सांगत आहे असं काहीही नाही. ज्या इलेक्ट्रॉनिक मशीनमधील मत बदलले जाऊ शकतात. भाजपला सर्व सोपं आहे. ज्या देशांमध्ये इलेक्ट्रॉनिक मधील मतं बदलली जाऊ शकतात. त्या देशांमध्ये काही होऊ शकते, असा गंभीर आरोप राऊतांनी केला. त्याच्यामुळे हे बिल सापडल्याने बिलात काही नाही या गोष्टीवर विश्वास नाही. ठीक आहे हा पोलीस तपासाचा विषय आहे, असे ते म्हणाले.
बीफ खाणे राष्ट्रीय अपराध नाही
बीफ खाने हा राष्ट्रीय अपराध नाही. भाजपच्या अनेक राज्यांमध्ये बीफ विक्री होते. कोणी काय खावं हे मोहन भागवत आणि सांगितलं आहे आणि कोणी काय खाल्लं त्यामध्ये ते गुन्हेगार आहे. असं आमचा पक्ष कधीच मानणार नाही .पोलीस तपास करू द्या .योग्य वेळी मी सांगतो काय सांगायचे ते. अजिबात न्याय मिळणार नाही उगाचच मागच्या दारातून पैसे फेकले. उपचाराचा खर्च केला म्हणजे न्याय नाही. न्याय मिळेल असं नाही ज्याने अपराध केला आहे, त्याच्यावरती कठोर कारवाई होणार याला न्याय म्हणतात असा हल्लाबोल त्यांनी केला.
पंतप्रधानांशी जवळीक असलेला न्यायाधीश
ते देशाचे सरन्यायाधीश आहेत, नोव्हेंबर महिन्यात ते निवृत्त होत आहेत आणि प्रधानमंत्री गणेशोत्सवासाठी किती जणांच्या घरी गेले त्याची माझ्याकडे माहिती नाही पण काल सर्वत्र सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान आरतीसाठी गेले, त्यांच्या दोघांचा संवाद पाहण्यात आला आणि धर्मनिरपेक्ष म्हणून घेणाऱ्या घेणाऱ्या राष्ट्रामध्ये एक छान चित्र पाहायला मिळालं यसरन्यायाधीश आणि प्रधानमंत्री हे संविधानाला आणि प्रोटोकॉलला धरून आहे का? याविषयी लोकांमध्ये आणि घटना तज्ञांमध्ये चर्चा सुरू आहे.
आमच्या सारख्यांच्या मनात प्रश्न आला प्रधानमंत्र्यांशी इतकी राजकीय जवळीक असलेले न्यायाधीश मग ते कोणीही असो की महाराष्ट्रातल्या घटनाबाह्य सरकारच्या बाबतीत आम्ही जी लढाई लढतोय त्यात आम्हाला न्याय का मिळत नाही, तारखांवर तारखा का पडत आहेत याबाबत आमच्या मनात आता शंका आहे, असा खरमरीत टोला त्यांनी लगावला.
सरन्यायाधीश पदावर चंद्रचूड यांसारखी व्यक्ती असताना तीन वर्ष एक बेकायदेशीर सरकार बसवलं जातंय, घटनाबाह्य पद्धतीने सरकार पाडले जातय, हे सरकार घटनाबाह्य आहे असं सरन्यायाधीश स्वतः वारंवार सांगत राहिले तरी निर्णय आणि निकाल होत नाही आणि ते आता निवृत्तीला आले, काल त्यांच्या घरी प्रधानमंत्री पोहोचले त्यामुळे यामागे वेगळं काही घडतंय का? सरकार वाचवण्यासाठी शिवसेना,राष्ट्रवादी,काँग्रेस पक्षासारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष पूर्णपणे खतम करायचे आणि त्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जाते का या लोकांच्या मनातल्या शंका काल पक्क्या झाल्या, असे राऊत म्हणाले.