मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात ज्या पत्रकार परिषदेचा बोलबाला होता ती पत्रकार परिषद अखेर पार पडलीय. यावेळी शिवसेना संजय राऊतांनी (Sanjay Raut Press Conference) भाजपवर (Bjp) तोफा डागत हजारो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नातील सर्वांची चौकशी केली आता फक्त बुटवाल्याकडे ईडी जायची बाकी आहे असा टोलाही लगावला आहे. तसेच त्यांनी भाजप नेत्यांच्या मुलीच्या लग्नातील कार्पेटचा (Sudhir Mungantivar)उल्लेख करत. त्याला कोट्यवधी रुपये खर्च झाले मात्र आम्ही कधी काही बोललो नाही असेही ते म्हणाले. मात्र तो नेता कोण ज्याच्या मुलीच्या लग्नात कोट्यवधी खर्च झाले हे सांगणे राऊतांनी टाळले होते. भाजप सरकारमधील वनमंत्री एवढाच उल्लेख राऊतांनी केला होता. मात्र राऊतांना उत्तर देताना भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी त्या नेत्याचे नाव सांगून टाकलं आहे.
भाजप नेत्यांकडून राऊतांची खिल्ली
राऊतांच्या पत्रकार परिषदेची सर्वच भाजप नेत्यांनी खिल्ली उडवली आहे. प्रवीण दरेकरांनी यावर बोलताना, आपटी बार तरी बरा असतो, साडे तीन नावं नव्हे एकही नाही सांगितलं. आता तुमच्या लग्नापर्यंत पोहोचले म्हणून तुम्ही मुनगंटीवारांच्या मुलीच्या लग्नापर्यंत पोहोचला, असे म्हणत राऊतांच्या बोलण्यातल्या त्या भाजप नेत्याचे नाव सांगून टाकले आहे. तसेच पुढे बोलताना, मला असं वाटतं की मोठा इन्व्हेंट करुन काहीतरी चित्र निर्माण करायचं, पण राऊत तोंडावर आपटले. ते ओपनली सांगत आहेत की मला जेलमध्ये टाका. उलट सोमय्यांनीच पीएमसी घोटाळा बाहेर काढला. पण सरकार तुमचंय, चौकशी करा, अटक करा, असे म्हणत राऊतांना प्रतिआव्हान दिलंय. तसेच सत्तेतला पक्ष मोर्चा काढतो हे दुर्दैव असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
राऊतांचा अमित शाह यांनाही फोन
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत आरोप करताना म्हटले, ‘ईडीचे अधिकारी माझे नातेवाईक, मित्र, मुलगा, मुलगी यांना फोन करून धमकावतात. नातेवाईकांवर, मित्रांवर छापे टाकतात. अरे लहान मुलांनाही धमकावतात. तुमच्या वडिलांना उद्या ईडीच्या चौकशीसाठी जावे लागणार. अटक होणार म्हणून. ज्या दिवशी माझ्या नातेवाईकांच्या घरावर ईडीचे छापे सुरु होते, त्याच दिवशी रात्री मी अमित शाह यांना फोन केला होता. जे सुरु आहे, ते चांगलं नाही म्हटलं. तुमची माझ्याशी दुश्मनी आहे तर मला टॉर्चर करा. पण तुम्ही माझ्या जवळच्या लोकांना टार्गेट करताय हे चुकीचं आहे. ” असेही राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.
Video| …तर राजकारण सोडेन, राऊतांनी निर्वाणीची भाषा का वापरली?