भूमिपूजनानंतर उद्धव ठाकरेही अयोध्येत जाणार, शिवसेना थाटामाटात कार्यक्रम करणार : संजय राऊत

| Updated on: Aug 05, 2020 | 12:50 PM

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अयोध्येत होत असलेल्या राम मंदिर भूमिपूजनावर आनंद व्यक्त केला (Sanjay Raut on Ayodhya Ram Mandir Bhoomi Pujan).

भूमिपूजनानंतर उद्धव ठाकरेही अयोध्येत जाणार, शिवसेना थाटामाटात कार्यक्रम करणार : संजय राऊत
विरोधकांना विरोध करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, अधिवेशन होऊनच द्यायचं नाही, ही आडमुठी भूमिका लोकशाहीच्या विरोधात असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
Follow us on

मुंबई : अयोध्येत होत असलेल्या राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आनंद व्यक्त केला आहे (Sanjay Raut on Ayodhya Ram Mandir Bhoomi Pujan). मात्र, त्याचवेळी घुमट काढण्यात शिवसैनिकांचा मोठा वाटा असल्याचं सांगताना कुणीही याचं श्रेय घेऊ नये असं म्हटलं. तसेच या भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील अयोध्येला जाणार आहे. शिवसेना तेथे थाटामाटात कार्यक्रम घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

संजय राऊत म्हणाले, “राम मंदिराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. हा शासकीय कार्यक्रम आहे. आजचा मुहूर्त महत्त्वाचा आहे. साधुसंतांनी सांगितल्याप्रमाणे आजच्या मुहूर्तावर भूमिपूजन होत आहे. आजच्या कार्यक्रमाचं श्रेय कोणीही घेऊ नये. कारण हा शासकीय कार्यक्रम आहे. बाळासाहेबांना आणि शिवसेनेला कोणी विसरु शकत नाही. राम मंदिर उभारणीतील त्यांचे योगदान मोठे आहे. अनेकांचे यात योगदान आहे. घुमट काढताना शिवसैनिकांचं मोठं योगदान आहे.”

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार आहेत. आम्ही अयोध्येत राम जन्मभूमीत थाटामाटात कार्यक्रम करणार आहोत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शिवसेनेच्यावतीने तिथे कार्यक्रम करणार आहे. आजच्या कार्यक्रमाला लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी वयोमानामुळे उपस्थित राहू शकले नाहीत,” असंही संजय राऊत यांनी नमूद केलं.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

दरम्यान, शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी शिवसेनेने राम मंदिर निर्माणासाठी 1 कोटी रुपये पाठवल्याची माहिती दिली आहे. एक व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी ही माहिती दिली होती. या व्हिडीओत अनिल देसाई म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याच्या वेळी राम मंदिर उभारणीसाठी 1 कोटींचा निधी देऊ असे जाहीर केले होते. त्यानुसार, उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या दिवशी शिवसेनेतर्फे राम मंदिर उभारणीसाठी 1 कोटींचा निधी स्टेट बँकेत जमा केला आहे. त्याबाबत अनिल मिश्रा आणि खजिनदार चंपकलाल यांनीही ते पैसे मिळाल्याची पोचपावती दिली.”

राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपतराय यांनी देखील महाराष्ट्रातून 1 कोटी रुपये आल्याचं सांगितलं आहे (Ram Mandir Trust Champat Rai on 1 Crore donation). तसेच हे 1 कोटी रुपये कुणी दिले हे माहिती नाही, मात्र, त्यावर शिवसेना असं लिहिलं असल्याचंही चंपतराय यांनी नमूद केलं.

हेही वाचा :

राम मंदिरासाठी 1 कोटी रुपये आले, कुणी पाठवले माहिती नाही, त्यावर नाव शिवसेना : राम मंदिर ट्रस्ट

बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाची माती घेऊन विक्रम प्रताप सिंग अयोध्येत!

शिवसेनेकडून एक रुपयाही नाही, अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांचा दावा; अनिल देसाईंकडून स्पष्टीकरण

Sanjay Raut on Ayodhya Ram Mandir Bhoomi Pujan