“काँग्रेसमधील घोळात आम्हाला पडायचं नाही”; संजय राऊत यांनी राजकीय तिढा स्पष्ट करून सांगितला

| Updated on: Jan 16, 2023 | 7:11 PM

संजय राऊत म्हणाले की, शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सूचना दिल्या असून त्यानंतरच शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसमधील घोळात आम्हाला पडायचं नाही; संजय राऊत यांनी राजकीय तिढा स्पष्ट करून सांगितला
Follow us on

मुंबईः पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. त्यातच नाशिकमधील सत्यजित तांबे यांच्यावर काँग्रेस पक्षाने केलेल्या कारवाईमुळे महाविकास आघाडीतील विस्कळीतपणा उघड उघड झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच संजय राऊत यांनी पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीविषयी आणि उमेदवारीबाबत चाललेल्या राजकीय घोळाविषयी मत व्यक्त करताना जागा वाटपाबाबत विस्कळीतपणा दिसून आल्याचे स्पष्टपणे सांगितले.

पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर झाल्यापासून सत्यजि तांबे यांच्यामुळे राजकीय घोळ झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले.

YouTube video player

तर त्यातच नाशिकमधून शुभांगी पाटील यांनी राष्ट्रवादीसह शिवसेनेने पाठिंबा जाहीर केल्याने सत्यजित तांबे यांच्याबाबत आता महाविकास आघाडीसह काँग्रेस काय निर्णय घेणार याकडेही साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीचा घोळ झाल्याने महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने मात्र याबाबत आम्हाला त्या प्रकरणात काय पडायचच नाही अशी भूमिका खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केली. तर ठाकरे गटाकडून शिवसेनेने कालच शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

त्यांना पाठिंबा जाहीर करताना संजय राऊत यांनी सांगितले की, त्यांची जोरदारपणे तयारी झाली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या लढतीत त्या पुढे जाणार हे स्पष्ट दिसून येत आहे.

संजय राऊत म्हणाले की, शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सूचना दिल्या असून त्यानंतरच शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नागपूर शिक्षक मतदार संघाबाबत शिवसेनेने जाहीर केलेली उमेदवारी त्यांना माघार घ्यायला लावली आहे. तर महाविकास आघाडीकडून एकत्रितपणे लढण्यासाठी शरद पवार, नाना पटोले यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली आहे.

यावेळी पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांबाबत घोळ दिसत असल्याने महाविकास आघाडीतीलही विस्कळीतपणा समोर आला आहे. त्यामुळे यापुढील निवडणुकीसाठी हा मोठा धडा मिळाला असल्याचेही संजय राऊत यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.