मुंबई | 1 March 2024 : देशातील परिस्थितीवर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला. गेल्या काही दिवसांपासून नरेंद्र मोदी आणि भाजपचे नेते लोकसभेच्या 400 जागा सहज निवडून येतील, असा विश्वास व्यक्त करत आहेत. त्याचा संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला. त्यांनी भाजपविरोधात वातावरण असल्याचे सांगत, भाजपनं किती मोठं टार्गेट समोर ठेवलंय, त्याच्या निम्म्या जागांवर भाजप निवडून येईल, असा दावा केला आहे. आपल्या खास शैलीत त्यांनी राज्य सरकारच्या धोरणांचा समाचार घेतला. काय म्हणाले खासदार राऊत?
तर राजकारणाचा संन्यास
भाजप २२० वर ऑलआऊट
मोदी पंतप्रधान होणार नाही, एवढ्या जागांचं टार्गेट ठेवलं. २२०च्या पुढे भाजप जात नाही. भाजपचं सरकार येतच नाही. देशाचा नकाशा समोर ठेवा. त्या राज्यानुसार गणितं मांडा. कुठून आणणार भाजप जागा. उत्तर प्रदेशातील ८० जागा त्यांना मिळून द्या, छत्तीसगड, हरयाणा, तेलंगनातील सर्व जागा त्यांना घेऊ द्या भाजप २२०च्या पुढे जाणार नाही, असा दावा त्यांनी केला.
नितीश बाबुंना पळण्याचा नाद
नितीश कुमार आज त्यांच्यासोबत आहे. उद्या पलटी मारेल. त्यांना पळण्याचा नाद असल्याचा चिमटा राऊत यांनी काढला. एनडीए म्हणजे भाजप, शिवसेना आणि अकाली दल होतो. आता बाकी मुरमुरे कुरमुरे आहेत. इंडिया आघाडीच्या राज्यांचा विचार केला तर इंडिया आघाडी किमान २९० जागा जिंकेल. आप आणि काँग्रेसची युती झाली आहे. दिल्ली, गुजरात आणि हरयाणात झाली आहे. पंजाबमध्ये काँग्रेस-आपची युती झाली नाही. पंजबामध्ये आप आणि काँग्रेसला जागा मिळाल्यावर इंडिया आघाडीला जागा मिळणार नाही. पश्चिम बंगालमध्येही ममता बॅनर्जी आणि काँग्रेसलाच जागा मिळेल.
देशाचं नेतृत्व कोण करेल
इंडिया आघाडीत अनेक चेहरे आहेत. राहुल गांधी खरगे आणि उद्धव ठाकरे आहेत. जागांचा विषय नाही. लीडरशीपचा विषय आहे. देश कुणाच्या नेतृत्वात पुढे जाईल हे महत्त्व आहे.
मोदी गॅरंटी ही केवळ जाहिरात
मोदी गॅरंटी फक्त जाहिरातीत आहे. बाकी कुठे आहे. भाजप हा चोरांचा पक्ष आहे. भाजप हा चोरबाजार आहे. काँग्रेसने कर्नाटकात काँग्रेसच्या सहा गॅरंटी आहे. तिथून आलेला हा फॉर्म्युला भाजपने चोरला. काँग्रेसने सहा गॅरंटी दिल्या होत्या, भाजप कनार्टकात हरले. त्यामुळे मोदींना वाटलं लोक गॅरंटी शब्दावर विश्वास ठेवतात म्हणून शब्द चोरल्याचा आरोप राऊत यांनी केला.