Sanjay Raut | भाजप सत्तेत आल्यापासून महाराष्ट्राचं वातावरण बिघडलं, खासदार संजय राऊत यांची घणाघाती टीका

| Updated on: Feb 20, 2024 | 10:32 AM

Sanjay Raut | मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने आज विशेष अधिवेशन बोलावले आहे. राज्य मागासवर्गी आयोगाचा मसूदा कॅबिनेटने मंजूर केला आहे. याप्रकरणी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पण त्यांची मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न एकमताने सोडवावा, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

Sanjay Raut | भाजप सत्तेत आल्यापासून महाराष्ट्राचं वातावरण बिघडलं, खासदार संजय राऊत यांची घणाघाती टीका
Follow us on

मुंबई | 20 February 2024 : मराठा आरक्षणाप्रकरणी राज्य सरकारने आज 20 फेब्रुवारी 2024 रोजी विशेष अधिवेशन बोलावले आहे. त्यात राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. तर विरोधी पक्षांनी, महाविकास आघाडीमध्ये पण या दृष्टीने हालचाली वाढल्या आहेत. घटकपक्षांची बैठक, चर्चा सुरु आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मराठा समाजाचा प्रश्न एकमताने सोडवावा अशी मागणी केली आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता, हे आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

भाजपवर निशाणा

यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार राऊत यांनी भाजपवर पुन्हा निशाणा साधला. भाजपचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राचं वातावरण बिघडलं आहे, असा घणाघाती आरोप त्यांनी केला. देशात इव्हीएम विरोधात आंदोलन सुरू आहे. जे सरकार विरोधात लढतात त्यांना तपास यंत्रणाचा वापर करून त्रास दिला जात असल्याची आरोप त्यांनी केला. विशेष अधिवेशन निर्णायक ठरावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा

शेतकरी आंदोलनासंदर्भात लवकरच निर्णय

शेतकरी आंदोलन उद्धव ठाकरे चंदीगडला जाण्याची चर्चा असल्याबाबत त्यांना विचारणा करण्यात आली होती. शिवसेना शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत मी माहिती घेतली, याविषयी उद्धव ठाकरे यांना सांगेल नंतर निर्णय होईल, असे ते म्हणाले. यापूर्वी शेतकरी आंदोलनावरुन केंद्रावर टीका करण्यात आली होती. जर कोणी सत्ताधारी पक्षाचा आमदार अशा प्रकारे धमक्या देत असेल तर तर राज्याला दुबळा गृहमंत्री मिळाला असल्याचा आरोप त्यांनी निलेश राणे यांच्या धमकीप्रकरणात केला.

यामुळे फोडाफोडी

भाजप स्वबळावर सत्तेत आली नाही तर मित्र पक्षांचं महत्त्व वाढेल म्हणून विरोधी पक्षातील नेत्यांना सोबत घेतलं जात आहे. दहशतीने बंदूक दाखवून सोबत घेतलं जात आहे त्यांचे कोणी मित्र नाही. भाजप सर्वाधिक जागा लढणार. त्यासाठीच महाराष्ट्राच्या अस्मितेवर बोलणारे पक्ष फोडले, अशी टीका त्यांनी केली. विशेष अधिवेशनाच्या तोंडावर विरोधकांच्या टीकेला धार चढली आहे. या अधिवेशनात सरकारच्या निर्णयानंतर विरोधक काय भूमिका घेतात, हे लवकरच स्पष्ट होईल.