आनंद दिघे यांच्या आनंद आश्रममध्ये पैशांची उधळण झाली. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. आनंद दिघे साहेब यांच्या आश्रमात जे लेडीज बारवाले होते… आतमध्ये घुसलेले मिंधे सेनेची लोक त्यांना आणि त्यांच्या बॉसला चापकाने फोडून काढलं असतं टेंभी नाक्यावर… कुठली संस्कृती ठाण्यामध्ये आली? एक तर तुम्ही आनंद आश्रमाचा बेकायदेशीर ताबा घेतला. त्यांचे जे मूळ मालक होते त्यांना धाक, दहशत या माध्यमातून तो जो पारशांचा ट्रस्ट होताय त्यांचा ताबा त्यांनी घेतला. मुळात ती शिवसेनेची प्रॉपर्टी आहे. आनंद दिघे साहेबांची प्रॉपर्टी आहे. तिथं असं घडतं? आनंद दिघेंच्या आश्रमात बार प्रमाणे पैसे उधळले, असं संजय राऊत म्हणाले.
आनंद आश्रमामध्ये पैसे उधळणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना शिवसेनेच्या पदावरून काढून टाकण्यात आलं आहे. कारवाई पदावरून काढणं खुलासे आणि माफ्या ही सर्व नौटंकी असते. मुळात राज्यकर्ते म्हणून राजकारणात तुमची संस्कृती आणि विकृती काय आहे? ठाण्यासारख्या सुसंस्कृत शहरांमध्ये ठाण्याच्या तलाव पाळीवर असेल. अनेक साहित्यिक सांस्कृतिक उपक्रमाने महाराष्ट्राला मोहात पाडलं. अनेक साहित्यिक कवी लेखक इथे निर्माण झाले. सामाजिक कार्यकर्ते निर्माण झाले. या ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता महाराष्ट्रात मिळून दिली असे सुसंस्कृत शहर ठाणे…, असं संजय राऊत म्हणाले.
ठाण्यामध्ये शिवसेनेने अनेक नेते निर्माण केले. सतीश प्रधान, मो. दा. जोशी असतील. धर्मवीर आनंद दिघे यांना तुम्ही आपले गुरु मानत आहात आणि त्यांची जी वास्तू होती, त्या वास्तुमध्ये दिघेसाहेब न्याय द्यायचे. दरबारात लोकांना भेटायचे. तिथे त्यांचं वास्तव्य होतं. त्या वास्तूमध्ये या मिंधे सेनेच्या लोकांनी गुंडांनी टार्गेट पोरांनी लेडीज बार मध्ये नाचतात आणि पैसे उधळतात लेडीज बारमध्ये त्या पद्धतीचा जो उपक्रम साजरा केला. आपण पहा हे चित्र अत्यंत विचलित करणारा चित्र आहे, असंही संजय राऊत म्हणाले.
मी कालही म्हणालो परवाही म्हणालो, आनंद दिघे जिथे बसत होते. त्या खुर्चीवरती एक हंटर लावलेला असायचा. त्या हंटरचा अर्थ असा होता चुकाल तर पाठीवर हंटर पडेल असं आम्ही म्हणायचं आणि अनेकांना तो हंटर पडलेला आहे आनंद दिघे म्हणजे तुमचे खाजगी नाहीत. कोणी अशा पद्धतीने ठाण्यातील लोकांची मान खाली जाईल शर्मेने अशा प्रकारचे कृत्य तुम्ही केला आहे. तुमच्या लोकांनी केलं हे तुमची संस्कृती आहे ती खाली आली आहे. मिंधे सेनेचे जे वरचे सरदार आहेत. शिलेदार ही त्यांची संस्कृती आहे ती खाली आली आहे. त्यामुळे आता कोण माफी मागत असेल पदावरून काढलं असेल अमुक असेल ही पूर्णपणे नौटंकी आहे, असा घणाघात राऊतांनी केला आहे.