नवी दिल्लीः शिवसेना विरुद्ध भाजप या राजकीय नाट्याचा दुसरा अंक आता सुरू झालाय. पुन्हा एकदा शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आक्रमक झालेत. त्यांनी नवी दिल्ली येथे आज माध्यमांशी बोलताना भाजप सरकारवर जोरदार टीका केली. चिखल फेकणाऱ्यांचे हात किती बरबटलेले आहेत, हे सुद्धा देशाला कळायला हवे, अशा शब्दांमध्ये आपला संताप व्यक्त केला. राऊत यांनी यापूर्वी मुंबईत शिवसेना भवनासमोर (Shivsena Bhavan) पत्रकार परिषद घेऊन आरोपांची राळ उडवून दिली होती. विशेषतः किरीट सोमय्या यांना जोरदार घेरले होते. त्यानंतर राऊत पुन्हा एकदा आक्रमक झालेले आज दिसले.
काय म्हणाले राऊत?
दिल्लीत बोलताना राऊत म्हणाले की, केंद्र सरकारकडून कारवाईची कोणतीही अपेक्षा नाही. केंद्र सरकारमधल्या काही मोजक्या लोकांच्या आदेशानुसार सुडाच्या कारवाया सुरू आहेत. खासकरून महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये या कारवाया होतात. त्यातही महाराष्ट्रात हे प्रमाण जरा जास्तच आहे, असा दावा त्यांनी केला. जे चिखल फेकत आहेत, त्यांचे हातसुद्धा किती बरबटलेले आहेत, ते सुद्धा देशाला कळायला हवं. हा एक रेकॉर्ड आहे. आम्ही तुम्हाला किती कळवले त्याचा. मुंबई महाराष्ट्रातल्या तपास यंत्रणांवर काम करतीलच, पण केंद्रातल्या यंत्रणा काय करत आहेत, हे देखील यानिमित्तानं कळेल, हे सांगायलाही राऊत विसरले नाहीत.
मुंबईत पत्रकार परिषद घेणार
संजय राऊत म्हणाले की, भाजपच्या दोन-पाच लोकांना हाताशी पकडून कशा प्रकारे एक क्रिमिनिल सिंडिकेट चालवत आहेत, याची माहिती संसदेचा सदस्य आणि शिवसैनिक म्हणून मी गोळा केली आहे. अशी माहिती मी वारंवार देत जाईन. यानंतर मुंबईत येऊन याबाबत पत्रकार परिषद घेईल. आमच्या सगळ्यांचे फोटो टॅप केलेत. तपास यंत्रणा महाराष्ट्रात सुद्धा आहेत. फक्त केंद्रातच नाहीत. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये जाणीवपूर्वक कारवाया केल्या जात आहे, या आरोपाचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला.
केंद्र सरकारकडून कारवाईची कोणतीही अपेक्षा नाही. केंद्र सरकारमधल्या काही मोजक्या लोकांच्या आदेशानुसार सुडाच्या कारवाया सुरू आहेत. खासकरून महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये या कारवाया होत्यात. त्यातही महाराष्ट्रात हे प्रमाण जरा जास्तच आहे.
– संजय राऊत, खासदार, शिवसेना
चर्चा तर होणारच: केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या दौऱ्याचे नाशिकमध्ये ‘कुर्रर्रर’ राजकीय नाट्य…!
कापडणीस पिता-पुत्राचा 4 जणांनी केला मर्डर; नाशिकमधील शेअर्स कंपनीच्या मॅनेजरचा सहभाग