महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे विधानसभेपूर्वी सक्रिय झाले आहेत. त्यांनी विधासभेच्या जागा लढविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. मनसे लोकसभा निवडणुकीत नव्हती. पण विधानसभेसाठी पक्ष मजबुतीने उतरणार आहे. त्यातच आज राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. त्यात पुण्यातील पूर स्थिती आणि इतर विषयांवर चर्चा झाल्याचे समजते. पण या दोघांच्या भेटीवर संजय राऊत यांनी जोरदार टोला हाणला आहे.
कितनी बडी डील?
आज राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या निवासस्थानावर भेट झाली.मनसने सर्व जागा लढवण्याची घोषणा केली होती. आज मुख्यमंत्र्याची भेट घेत आहेत. कितनी बडी डील हो सकती है, असा टोला त्यांनी लगावला. त्यांच्या या वक्तव्यावर आता वाद होण्याची शक्यता आहे.
कोण आहे सचिन वाझे?
सचिन वाझे कोण आहेत? आरोपी आहेत. कोठे आहेत ते सध्या? साबरमतील् आहेत, वर्ध्याला पवनार आश्रमात तपस्या करतायेत का, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. पराभव टाळण्यासाठी भाजप अशा महाभागांना पुढं करतेय. अनिल देशमुखांनी फडणवीस यांच्याविषयी काही माहिती पुढे आणली. काही आरोप केले. त्याला फडणवीस यांनी उत्तर द्यायला हवे होते. पण त्यांना त्यासाठी त्यांना तुरुंगातील प्रवक्ता लागतोय, असा टोला त्यांनी लगावला.
ॲंटीलिया प्रकरणातील आरोपी कोठे आहेत. मुंबई पोलीस आयुक्तांना क्लीन चीट दिली आहे. एक मिंधे गटात गेले आहेत. ते अंधेरीमधून विधानसभा लढवतील. हे पण जातील. मुंबईचे पोलीस आयुक्त आरोपी होते. त्यांना मोकळे सोडण्यात आले आहे. भाजप निवडणुका जिंकण्यासाठी गुंड टोळ्यांचा आधार घेत आहे. त्याचे हे उदाहरण असल्याचा टोला त्यांनी लगावला.
ही भाजपची क्रिमिनल वेब सीरीज
कधी काळी सचिन वाझे आमच्या जवळचे होते, हे सोडुन द्या… मिंधे पण जवळचे होते. मोदी पण जवळचे होते. पण आता वर्तमानात बोला. मुंडा बिगड गया तो हम क्या करे, असे ते म्हणाले. जेल मधील गुंडाना फोन जात आहेत. जेल मधुन फोन येत आहे. निवडणुकांसाठी भाजप हे सर्व करत आहे.
भाजपची ही वेब सीरीज सुरु आहे. क्रिमिनल वेब सीरीज आहे. अनिल देशमुखांना उत्तर देण्यासाठी खास तुरंगातील गुंडांना बाहेर आणन्यात आले.अमित शहा म्हणजे सरदार पटेल नाहीत, जयप्रकाश नारायण नाहीत. विनोबा भावे नाहीत. मला अटक होण्याआधी मला ही ॲाफर आली होती. ही बाब मी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना ही माहिती पत्र लिहुन कळवली होती. माझ्यावर दबाव येत आहे हे मा त्यांना सांगितले होते, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस स्वतः निवडणूक हरणार आहेत, असा दावा त्यांनी केला.