नागपूर शहरात रविवारी रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत ऑडी कार चालकाने एका दुचाकीसह काही वाहनांना धडक दिली. या हिट अँड रन केसमधील कार ही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याची असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. बावनकुळेंनीही ते मान्य केलं आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊतांनी भाजपला घेरलं आहे. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असेपर्यंत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊ शकत नाही, असं राऊत म्हणालेत.
कोण कुठल्या पार्टीचा आहे, त्याच्याशी आम्हाला मतलब नाही. शहजादे नशेमध्ये होते. त्यांना वाचवत आहेत. कोणत्या दुसऱ्या पार्टीचा नेत्याचा मुलगा असला तर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या फौजेने आमच्यावरती किती तरी हल्ले केले असते. देवेंद्र फडणवीस तुम्ही गृहमंत्रिपदावरती बसण्याचे लायक नाहीत. जोपर्यंत फडणवीस त्या पदावरती आहेत त्या आरोपीचे चौकशी होणार नाही रश्मी शुक्ला जोपर्यंत डीजी पदावर आहे तोपर्यंत चौकशी होणार नाही, असं संजय राऊत म्हणालेत.
पोलीस यंत्रणा देवेंद्र फडणवीसांच्या कोठ्यावर नाचत आहे. नाचवले जात आहे. विकत घेतले जात आहे एफआयआरमध्ये संकेत बावनकुळेचं नाव देखील नाही . लाहोरी बारचे cctv काढा… कोण दारू पिऊन नशेत होते. चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा विषय नाही आहे. या राज्यातल्या कायदा असं व्यवस्थेचा जो कचरा झालेला आहे कायदा दोन आहेत का? एका बाजूला नरेंद्र मोदी सामान कायद्याच्या गोष्टी करतात. कायदा सर्वांसाठी सारखा आहे, म्हणतात पण या राज्यात तसे नाही आहे, असंही राऊतांनी म्हटलं आहे.
नागपुरातील हिट अँड प्रकरणात दुर्दैवाने विरोधी पक्षाला मुलगा असता तर देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्या फौजा आहेत, त्या आमच्यावर तुटून पडल्या असत्या. चार जखमी आहेत दोन गंभीर जखमी आहेत लाहोरी बारमध्ये… दोन वेळा झालं सीसीटीव्ही फुटेज नेहमीप्रमाणे गायब आहे. नंबर प्लेट गाडीची काढून टाकली. ड्रायव्हरचे अदलाबदली झाली शाहजादे, युवराज हे गाडी चालवत होते… एकाला वेगळा न्याय आणि दुसऱ्याला वेगळा न्याय…हे कोणत संविधान आहे? देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती राज्याच्या गृहमंत्री पदाला लायक नाहीत, असंही संजय राऊत म्हणालेत.