संजय राऊत यांचा शिंदे गटावर मोठा हल्ला; थेट जत्रेतील तंबूशी केली तुलना

| Updated on: Jun 17, 2023 | 10:56 AM

शिवसेनेचा येत्या 19 जून रोजी वर्धापन दिन आहे. त्यावरून शिंदे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. शिंदे गटाची शिवसेना ही जत्रेतील शिवसेना आहे. जत्रेतील तंबूसाऱखी आहे. तंबू उठताच जत्रा पांगते, असं राऊत म्हणाले.

संजय राऊत यांचा शिंदे गटावर मोठा हल्ला; थेट जत्रेतील तंबूशी केली तुलना
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : येत्या 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी दोन्ही गटाने कंबर कसली आहे. ठाकरे गटाचा वर्धापन दिन षण्मुखानंद हॉलमध्ये होणार आहे. शिंदे गटानेही मुंबईतच हा वर्धापन दिन घेण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्धापन दिनाचा शिंदे गटाने टीझर जारी केला आहे. या टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांना दाखवण्यात आलं आहे. त्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. जाहिरातीत जे लोक बाळासाहेब ठाकरे यांना विसरले. ते आता टीझर दाखवत आहेत, असा टोला संजय राऊत यांनी शिंदे गटाला लगावला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

YouTube video player

शिवसेनेचा वर्धापन दिन 19 जूनला आहे. उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत. ते शिवसेनेच्या वर्धापन दिनाला संबोधित करणार आहेत. गावच्या जत्रेत तंबू असतो. त्या तंबूत खोट चंद्र असतो. खोटी मोटारसायकल असते. लोक चंद्र पाहून फोटो काढतात. तशी ही खोटी शिवसेना आहे. उद्धव ठाकरे यांचीच खरी शिवसेना आहे. शिंदेंची शिवसेना ही जत्रेतील शिवसेना आहे. आमचा वर्धापन दिन वाजतगाजत आणि जोरात होणार आहे. उद्या वरळीला आमचं शिबीर आहे. ते जोरात होईल. जत्रा संपली की जत्रेतील तंबू उठतात. ते काय ट्रेलर दाखवत आहेत? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

हे सुद्धा वाचा

तर माझ्या शुभेच्छा

यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरूनही प्रतिक्रिया व्यक्त केली. मंत्रिमंडळ विस्तार झाला तर माझ्या शुभेच्छा आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

हा डरपोकपणा आहे

अयोध्या पौळ यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरूनही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करावा. एका महिलेवर हल्ला झाला. विरोधी पक्षात आहे म्हणून हा हल्ला झाला. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात झाला. काय करतात पोलीस? हीच का तुमच्या शहरातील महिला कार्यकर्त्यांची सुरक्षा? हा माझा पोलीस आयुक्तांना सवाल आहे, असं राऊत म्हणाले. तिला फसवून कार्यक्रमाला बोलावलं आणि हल्ला केला. हा डरपोकपणा आहे, असा हल्लाबोलही तिने केला.

पंतप्रधानांचा सन्मान व्हावा

दिल्लीतील नेहरू म्युझियमचं नाव बदलण्यात आलं आहे. त्यावरूनही राऊत यांनी केंद्र सरकारला घेरलं. सर्व पंतप्रधानांना मानाचं स्थान मिळायला हवं. नेहरूंचं नाव ठेवून म्युझियमचं नाव बदलता आलं असतं. पंडित जवाहरलाल नेहरू प्राईम मिनिस्टर म्युझियम म्हणता आलं असतं. पण जुन्या लोकांचं नाव मिटवण्याचा हा प्रकार आहे, अशी टीका त्यांनी केली.