VIDEO: पूनम महाजन सध्या कुठे आहेत?, संजय राऊतांचा सवाल; महाजनांवरील कार्टुनबाबत केला खुलासा

| Updated on: Jan 25, 2022 | 12:24 PM

दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्यावरील कार्टुन हे महाजनांवर व्यक्तिगत टीका करणारं नव्हतं. त्या काळात भाजप आणि शिवसेनेची काय ताकद होती हे अधोरेखित करणारं हे ट्विट होतं.

VIDEO: पूनम महाजन सध्या कुठे आहेत?, संजय राऊतांचा सवाल; महाजनांवरील कार्टुनबाबत केला खुलासा
sanjay raut reply to Poonam Mahajan to cartoon on pramod mahajan
Follow us on

मुंबई: दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन ( pramod mahajan )यांच्यावरील कार्टुन हे महाजनांवर व्यक्तिगत टीका करणारं नव्हतं. त्या काळात भाजप आणि शिवसेनेची काय ताकद होती हे अधोरेखित करणारं हे ट्विट होतं. भाजप नेत्यांनी केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर ते कार्टुन पोस्ट केलं होतं. हे ट्विट डिलीट केलं असलं तरी जिथे पोहोचायचं तिथे पोहोचलं आहे. लोकांनी पोहोचवलं आहे, असं सांगतानाच पूनम महाजन सध्या कुठे आहेत? त्यांचं भाजपशी काय नातं आहे?, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी केला आहे. काल संजय राऊत यांनी ट्विट केलं होतं. त्याला भाजप नेत्या पूनम महाजन (poonam mahajan) यांनी आक्षेप घेत संजय राऊतांवर जोरदार टीका केली होती. या पार्श्वभूमीवर संजय राऊत बोलत होते.

ते कार्टून मी काढलं नाही. आरके लक्ष्मण यांनी काढलं आहे. त्यांनी टाईम्स ऑफ इंडियात ते कार्टुन तेव्हाच छापलं होतं. त्यावेळी शिवसेना काय होती हे त्यातून दिसतं. मी व्यक्तिगत रित्या प्रमोद महाजनांवर टीका केली नाही. ते भाजपचे नेते होते. बाळासाहेब त्यांच्यावर प्रेम करायचे. पूनम आता कुठे आहेत मला माहीत नाही. भाजपमध्ये महाजन परिवार, मुंडेंचं कुटुंब असो की मनोहर पर्रिकराचं कुटुंब असेल सर्वांना अंधारात ढकललं आहे. त्यामुळे भाजपमध्ये तुम्ही कुठे आहात हे मी पूनम यांना विचारू इच्छितो. पण मी त्यांची टीका वैयक्तिक घेत नाही. त्यांना माझं म्हणणं आवडलं नसेल, त्यांच्या वडिलांबाबत तर मीही अस्वस्थ आहे. कारण महाजन कुटुंबाशी माझे चांगले संबंध आहे, असं राऊत म्हणाले.

तेव्हाच आक्षेप घ्यायला हवा होता

या कार्टुनमध्ये सुरुवातीचा युतीचा काळ आला आहे. भाजप नेत्यांनी काल जी वक्तव्य केली होती त्यांना त्यावेळी भाजप काय होती हे दाखवण्यासाठी व्यंगचित्रं दाखवलं. ते आरके लक्ष्मण यांचे चित्रं आहे त्या काळातील. त्यावरून पूनम महाजन यांना अस्वस्थ होण्याचं कारण नव्हतं. महाजनांवर व्यक्तिगत टीका करण्यासाठी ते चित्रं दाखवलं नव्हतं. तसं होतं तर 30-35 वर्षापूर्वीच त्यावर आक्षेप घ्यायला हवा होता, असं सांगतानाच सध्या महाजन कुटुंबातील पिढी कुठे आहे? त्यांचं भाजपचं नातं काय आहे? असा सवालही त्यांनी केला.

दिल्ली एखाद्या राजकीय पक्षाची नाही

यावेळी त्यांनी दिल्ली काबीज करण्याच्या विधानावरही सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली. दिल्ली काबीज करणं म्हणजे सर्व पक्षांना एकत्र घेऊन भाजपला सत्तेतून हटवणं. त्यालाच दिल्ली काबीज करणं म्हणतात. आज एक दोन व्यक्तिंच्या हातात दिल्ली आहे. दिल्लीवर देशाचं वर्चस्व पाहिजे. दिल्ली देशाची आहे. एखाद्या राजकीय पक्षाची किंवा एखाद दुसऱ्या व्यक्तिची नाही, असं त्यांनी ठणकावले.

हिंदुत्वावर शिवसेनेनेच निवडणूक लढवली

मुंबईत विलेपार्लेत विधानसभेची पोटनिवडणूक झाली होती. त्यावेळी देशात पहिल्यांदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवण्यात आली होती. बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा उघड प्रचार केला होता. त्या पोटनिवडणुकीत आमच्या विरोधात काँग्रसही होती आणि भाजपही होती. तरीही आम्ही पोटनिवडणूक जिंकलो. रमेश प्रभू निवडून आले होते. त्यानंतर सर्वांना झटका लागला.

बाळासाहेबांनी जो हिंदुत्वाचा मुद्दा उचलला, तो लोकांना भावला आणि देशात हिंदुत्वाला समर्थन मिळेल, हिंदुत्व वाढेल आणि त्याच मुद्द्यावर आम्ही निवडणुका जिंकू शकतो हे दिसून आलं. त्यानंतर युतीची चर्चा सुरू झाली. बाळासाहेबांकडे भाजपचे बडे नेते आले. आपण एकत्र निवडणूक लढू असं त्यांनी सांगितलं. बाळासाहेबांनी होकार दिला. हिंदुत्वाच्या मतांचं विभाजन होऊ नये असं त्यांना वाटलं. वाजपेयी, अडवाणी आणि महाजनांसारख्या मोठ्या नेत्यांनी ही युती घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. नंतर महाजन आणि मुंडे यांनी 20 वर्ष युतीसाठी महत्त्वाची भूमिका निभावली. आज जे भाजपचे नवे नेते आहेत, नव हिंदुत्ववादी आहेत. त्यांच्या इतिहासातील काही पाने कोणी तरी फाडली आहेत. त्यामुळे त्यांना काही माहिती नाही, पण त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा आम्ही वेळोवेळी उत्तर देत राहू, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

बर्थडे सेलिब्रेट करायला गेले, पण वाटेतच होत्याचं नव्हतं झालं! वर्ध्यातील अपघाताचा अंगावर काटा आणणार घटनाक्रम

गोण्यात भरून आणायचा नोटा, आता खात्यात शून्य!! औरंगाबादच्या 30-30 घोटाळ्याचा सूत्रधार संतोषचे नाशिक कनेक्शन काय?

National Children’s Award | 14 किलोमीटर खाडी 4 तास 9 मिनिटांत पोहून पार; ‘स्वयंम’च्या यशाने पंतप्रधानही भारावले…!