मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आणखी एकदा शिवसेना (Shivsena) भवन इथं पत्रकार परिषद घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. संजय राऊत यांनी ट्विट द्वारे उद्या सांयकाळी शिवसेना भवन येथे 4 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचं म्हटलंय. संजय राऊत यांनी यापूर्वी 15 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेत भाजप (BJP) नेते आणि केंद्रीय यंत्रणांवर टीका केली होती. संजय राऊत यांच्या त्या पत्रकार परिषदेत त्यांचं मुख्य टार्गेट हे किरीट सोमय्या हे होतं. त्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी किरीट सोम्मया आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर निशाणा साधला होता. गेल्या काही दिवसांमधील महाराष्ट्रातील आणि देशातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेत नेमक काय बोलणार हे पाहावं लागणार आहे.
Will be addressing a press conference tomorrow 4 pm at shivsena bhavan.
Watch this space.
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/xVh8ToHaTs— Sanjay Raut (@rautsanjay61) March 7, 2022
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कालचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. नवाब मलिक यांच्या अटकेनंतर महाविकास आघाडी सरकारनं त्यांचा राजीनामा घेणार नाही, अशी भूमिका घेतील आहे. नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून आक्रमकपणे आंदोलन करण्यात येत आहे. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागानं छापा टाकला होता. हा छापा जवळपास चार दिवस सुरु होता. त्यामुळं केंद्रीय तपास यंत्रणांकडून करण्यात येत असलेल्या कारवायांवर संजय राऊत काय प्रत्युत्तर देतात हे पाहावं लागणार आहे.
केंद्रीय यंत्रणांकडून त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करण्यात येतोय असा दावा करत संजय राऊत यांनी त्यांच्याकडील पुरावे पीएमओकडे दिल्याचं म्हटलं होतं. काही अधिकारी खंडणीचं रॅकेट वसुली एजंटातर्फे चालवत असल्याचे पुरावे पंतप्रधान कार्यालयाकडे दिल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. यासंदर्भात लवकरच पत्रकार परिषद घेणार असल्याचं संजय राऊत म्हणाले होते. उद्या होणाऱ्या पत्रकार परिषदेत संजय राऊत या मुद्यांवर बोलणार का हे पाहावं लागणार आहे.
Game has just begun!
Today submitd evidences to @PMOIndia of hw Centrl Agencies r misusng powers selctivly agnst a few.Submitd proofs on hw sm officials r indulgd in extortion& blackmailng thru ‘Vasuli agents’.
Wil addrss a PC vry soon to share more details.
Watch this space!— Sanjay Raut (@rautsanjay61) February 28, 2022
दरम्यानच्या काळात संजय राऊत आणि एकनथ खडसे यांचे फोन टॅप करण्यात आल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यावर देखील भाष्य करु शकतात.
इतर बातम्या :