Sanjay Raut: मोदींना महागाईपेक्षा रशिया-युक्रोन युद्धाचीच अधिक चिंता; राऊतांनी भाजपला डिवचले

| Updated on: May 07, 2022 | 11:45 AM

Sanjay Raut: राऊत यांनी आपल्या ट्विटमधून घरगुती गॅस सिलिंडरचे दर शेअर केले आहेत.

Sanjay Raut: मोदींना महागाईपेक्षा रशिया-युक्रोन युद्धाचीच अधिक चिंता; राऊतांनी भाजपला डिवचले
संजय राऊत
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: देशात आज 50 रुपयांनी घरगुती गॅस ( gas cylinder) महागला आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना एका सिलिंडरमागे आता जवळपास हजार रुपये मोजावे लागणार आहे. महागाईचा भडका उडाल्याने शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (pm narendra modi) टीका करून भाजपला डिवचले आहे. देशभरात महागाई वाढली आहे. त्यावर भाजपचं कोणीच कसं बोलत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी युरोप दौऱ्यावर जाऊन आले. त्यांना युक्रेन आणि रशियातील युद्धाची चिंता आहे. पण देशातील महागाईची त्यांना चिंता नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली. या दोन्ही देशात मोदी मध्यस्थी करत आहेत. त्यामुळे त्यांचे भक्त त्यांची वाहवा करत आहेत. पण या देशातील जनता महागाईशी युद्ध करत आहे. पेट्रोल, डिझेल, सिलिंडर, बेरोजगारी या संदर्भात भाजपचा एक तरी नेता किंवा मंत्री बोलतोय का? भोंग्यावर कसले बोलता याच्यावर बोला. सरकार म्हणून अन्न, वस्त्र, निवारा आणि महागाईवर बोलणं तुमचं कर्तव्य आहे. भोंग्यावर बोलणं तुमचं काम नाही, असं राऊत यांनी भाजपला सुनावलं.

संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते. आज संपूर्ण देशात सर्वात मोठी समस्या महागाई आहे. केंद्रीय अर्थमंत्रीही महागाईवर बोलत नाहीत. भाजपचे राज्यातील प्रमुख नेतेही महागाईवर बोलत नाहीत. त्यांचे मुद्दे वेगळे आहेत. राज्यातील भाजप नेते पंजाब आणि महाराष्ट्रातील पोलिसांवर टीका करत आहेत. पण महागाईवर चकार शब्द बोलत नाहीत. रशिया-युक्रेनचा झगडा ते पाहून घेतील. तुम्ही महागाईवर तर बोला, अशा शब्दात राऊत यांनी भाजपला फटकारले.

हे सुद्धा वाचा

 

राऊतांचं ट्विट

राऊत यांनी ट्विट करूनही महागाईवर भाष्य केलं आहे. राऊत यांनी आपल्या ट्विटमधून घरगुती गॅस सिलिंडरचे दर शेअर केले आहेत. घरगुती गॅसचे दर 50 रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. दिल्लीत 14.2 किलोच्या सिलिंडरची किंमत 999.50 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. नवीन दर आजपासून लागू होणार आहेत. घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 22 मार्च रोजी 50 रुपयांनी वाढली होती, असं ट्विट राऊत यांनी केलं आहे.

भोंग्याबाबत एकच धोरण हवं

यावेळी त्यांनी लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावरूनही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली. राज्यात लाऊडस्पीकरचा मुद्दाच नाही. इथे कायद्याचं राज्य आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार आम्ही काम करतो. तणाव निर्माण करण्याचा दंगे घडवण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला. पण हा मुद्दा उठलाच नाही. मशिदीवरील भोंग्याचा विषय ज्यांनी काढला. त्याचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्रात हिंदू मंदिरांना बसला. भजन, कीर्तन करणाऱ्या मंडळांना बसला. या भूमिकेवर सर्वात जास्त नाराज हिंदू समाज आहे. त्यांनी हिंदू समाजातच फूट पाडायचा प्रयत्न केला. त्यांना हिंदू धर्मात गट करून आपआपसात दंगली घडवायच्या आहेत, असा आरोपही राऊत यांनी केला. तसेच देशभरात भोंग्याबाबतचं एकच एक धोरण असावं अशी मागणीही त्यांनी केली.