मुंबई: कोर्लई गावातील 19 बंगल्यांच्या मुद्द्यावरून भाजपचे नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला (shivsena) घेरले आहे. सोमय्या यांनी आज थेट शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांना पाठवलेले आणि रश्मी ठाकरे (rashmi thackeray) यांनी कोर्लईच्या सरपंचाला लिहिलेले पत्रच पत्रकार परिषदेत वाचून दाखवले. भ्रष्टाचार उघड करत असल्याबद्दल संजय राऊत यांनी आपलं कौतुक केलं आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्याला मेंटल रुग्णालयात, कोव्हिड रुग्णालयात भरती करण्याची भाषा करत आहेत. शिवसेनेतच एक वाक्यता नसल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. तसेच, रश्मी ठाकरे यांनी कोर्लईच्या सरपंचाला आधी पत्र लिहून बंगले आपल्या नावावर करण्याची विनंती केली होती. नंतर दुसरं पत्रं लिहून या जागेवर बंगलेच अस्तित्वात नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे फोर्जरी कोण करतंय? आणि चिटींग कोण करतंय? असा सवाल सोमय्या यांनी राऊत यांना केला आहे.
किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या आरोपांना उत्तरं दिली. संजय राऊतांनी मला पत्र लिहिलं होतं. 11 ऑक्टोबर 2021 रोजी हे पत्रं राऊतांनी लिहिलं होतं. प्रिय श्री किरीट सोमय्याजी, जय महाराष्ट्र. भ्रष्टाचार आणि शासकीय पैशाचा अपहार आदी अनेक प्रकरणे आपण उघड केले. हे राष्ट्रावर उपकार झाले. त्यामुळे अनेकांना तुरुंगात जावं लागले. भ्रष्टाचार विरोधातील आपल्या लढ्याला बळ मिळावं, असं राऊत यांनी या पत्रात म्हटलं आहे. राऊत कौतुक करतात आणि मुख्यमंत्र्यांपासून इतर लोक म्हणतात सोमय्यांना वेड्याच्या इस्पितळात दाखल करा, अशी टीका सोमय्या यांनी केली.
उद्धव ठाकरेंनीही पत्रं लिहिलं. 19 बंगल्याच्या प्रकरणावर सरपंच बोलतात, उद्धव ठाकरे का बोलत नाहीत? बायकोची बाजू घ्यायची नाही?, असा सवाल त्यांनी केला. 23 मे 2019 आणि जानेवारी 2019 रोजी रश्मी ठाकरेंनी कोर्लईच्या सरपंचांना पत्र लिहिलं होतं. आम्ही 30 एप्रिल 2014 रोजी जमीन मालक अन्वय मधुकर नाईक यांच्या जागा खरेदी केल्या असून यातील असेसटमेंट क्रमांक 787 ते 779 आणि 801 ते 805 हे घर आमच्या नावे केल्यास मी आपले ऋणी राहणार, असं रश्मी ठाकरे आणि मनिषा रवींद्र वायकर यांनी पत्रात नमूद केलं होतं. त्यावर सरपंचाची रिसीव्ह म्हणून सही आहे. मी हे पत्रं ग्रामपंचायतीतूनच नाही तर चारही ठिकाणी आरटीआयमधून मी माहिती मिळवली आहे, असं त्यांनी सांगितलं.
2 फेब्रुवारी 2019 रोजीही रश्मी ठाकरेंनी सरपंचांना पत्रं लिहिलं होतं. ही मिळकत आम्ही अन्वय नाईक यांच्याकडून खरेदी विक्री खताद्वारे विकत घेतली आहे. आम्ही मिळकत खरेदी केली तेव्हा कोणतेही बंगले अथवा घरे नव्हती, असं रश्मी ठाकरे म्हणाल्या होत्या. त्यामुळे फोर्जरी कोण करत आहे. चिटींग कोण करत आहे? जनतेची फसवणूक कोण करत आहे? बंगले नाही सांगत सोमय्याला जोड्याला मारणार असं तुम्ही म्हणता हे पत्रं काय आहे? असा सवाल त्यांनी केला. मुख्यमंत्री यावर का बोलत नाही? कुणाहीमध्ये त्यावर बोलण्याची हिंमत नाही, असंही ते म्हणाले.
काही महिन्यांपूर्वी सचिन वाझेंसारखा महान व्यक्ती नाही. सर्वात प्रामाणिक अधिकारी आहे, असं उद्धव ठाकरेंनी वाझेंचं गुणगाण केलं आहे. त्यांनी शिवीगाळ केली आहे. राऊतांबद्दल द्वेष नाही. ही उद्धव ठाकरेंची भाषा आहे. शिवसेनेच्या प्रत्येक नेत्याने वाझेचं गुणगाण गायलं आहे. राऊत हे शिवसेनेचे पहिले प्रवक्ते आहेत तर वाझे हे सेनेचे दुसरे प्रवक्ते आहेत, असं त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या:
Maharashtra News Live Update : सरकार सूडाचं राजकारण करतंय, फडणवीसांचा औरंगाबादेत आरोप
अक्षरशः हैवानीयत; येवल्यात लाकडी दांडक्याने गुरासारखी मारहाण, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ!