संजय राऊत हे शरद पवार यांच्यावर भडकले; शरद पवार म्हणतात, भाजपशी संबंध नाही

| Updated on: Aug 14, 2023 | 10:34 PM

महाविकास आघाडीचे शिलेदार संजय राऊत काका-दादांच्या गुप्त भेटीवरून भडकले. आपला भाजपशी संबंध नाही. उलट तुम्ही बोलून वारंवार संभ्रम निर्माण करता, असं शरद पवार म्हणाले

संजय राऊत हे शरद पवार यांच्यावर भडकले; शरद पवार म्हणतात, भाजपशी संबंध नाही
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : अजित पवार यांच्या गुप्त भेटीवरून संजय राऊत हे शरद पवार यांच्यावर संतापले. संभ्रम निर्माण होईल, असं काम भिष्म पितामह यांनी करू नये. आम्ही मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत चहा प्यालो तर चालेल का, असा सवालही संजय राऊत यांनी केला. महाविकास आघाडीचे शिलेदार संजय राऊत काका-दादांच्या गुप्त भेटीवरून भडकले. आपला भाजपशी संबंध नाही. उलट तुम्ही बोलून वारंवार संभ्रम निर्माण करता, असं शरद पवार म्हणाले. संजय राऊत म्हणाले, दोन नेत्यांमध्ये परवा बैठक झाली. त्यात चर्चा झाली. महाराष्ट्रात संभ्रमाचं वातावरण वारंवार निर्माण होत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीवर परिणाम होऊ शकतात. लोकांच्या मनात संशय आणि संभ्रम येईल, अशाप्रकारचं नेतृत्व निदार भिष्म पितामह यांनी करू नये. त्याबाबतीत आमची भूमिका स्पष्ट आहे.आम्ही लढणारी लोकं आहोत. नाती-गोती प्रेम घरामध्ये. चुकीच्या लोकांशी हातमिळवणी करून आम्हाला कुणी आव्हान देत असेल, तर ते योग्य नाही.

संभ्रम काही नाही

शरद पवार म्हणाले, संभ्रम वैगेरे काही नाही. महाविकास आघाडीमध्ये विचारनं जे एकत्र आलं त्यांची भूमिका आज भारतीय जनता पार्टीशी संबंधित घेतलेली आहे. भाजपच्या घटकांशी आमचा कुठलाही संबंध असण्याचं कारण नाही. मी भूमिका स्पष्ट केल्यानंतर संभ्रम राहिलेला नाही.

 

अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली. तरीही पुण्यात अजित पवार आणि शरद पवार भेटतात. त्यामुळे जनता आणि कार्यकर्त्यांच्या मनात जागा निर्माण होण्यास जागा आहे. यावरून राऊत सामनामधूनही भडकले.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवार यांच्या भेटीला जात आहेत. शरद पवार हे या भेटी वारंवार टाळत आहे. काही भेटी उघडपणे झाल्या. तर काही गुप्तपणे झाल्याचं सांगितले.