लोकसभेची रणधुमाळी सुरु झाली आहे. महाविकास आघाडीत ठाणे, कल्याण, डोंबिवली, पालघर या जागा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात लढविण्यात येतील असे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. ठाणे आणि कल्याण डोंबिवली या दोन्ही जागा आम्ही जिंकत आहोत. ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक जागा शिवसेना जिंकेल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचले. तर पालघर आणि कल्याण उमेदवार उद्या जाहीर होणार असल्याचे सांगितले. त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना पुन्हा जवळ करण्याचा प्रयत्न केला.
काय म्हणाले राऊत
ठाणे -कल्याण ही जागा शिवसेना कडेच आहे आणि राजन विचारे शिवसेनेचे उमेदवार आहेत .दुसरा गट भाजपा बरोबर व्यवहार करत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, असे ते म्हणाले. ठाणे, कल्याण, डोंबिवली ,पालघर या जागा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या आहेत. तो गट फुटलेला आहे आणि भाजपासोबत दोन्ही धूनी भांडी करत आहेत .त्यांना हा प्रश्न विचारावा, त्यांना विचारते कोण? काही दिवसांनी दिल्लीत वेटिंगवर आहेतच. काहीतरी परिवर्तन होईल, तेव्हा वर्षा बंगल्याच्या बाहेर देखील हे वेटिंग वरती दिसतील,असा टोला त्यांनी हाणला.
आंबेडकरांनी आमच्यासोबत यावे
प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा झाल्या आहेत. त्यांनी आमच्यासोबत यावे. संविधान वाचविण्याची जबाबदारी देशाच्या प्रत्येक नागरिकाची आहे.आंबेडकर यांना आम्ही वारंवार आवाहन केलेल आहे आणि चर्चा देखील केली आहे. आम्हाला खात्री आहे संविधानाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांच्या बाजूने ते प्रत्यक्ष किंवा ते अप्रत्यक्ष ते उभे राहणार नाहीत. ते आंबेडकर आहेत.आमची लढाई संविधानाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांच्या विरोधात आहे. त्यांच्यासोबत प्रकाश आंबेडकर राहणार नाही.वेळोवेळी मीटिंगमध्ये आंबेडकर यांना बोलवलं आहे. सर्वांनी नोटीस केलेले आहे. कालच्या मीटिंगमध्ये ते नव्हते .त्यांना एक प्रस्ताव दिलाय. त्या प्रस्तावामध्ये ५ जागा ऑफर केल्या आहेत..
महाविकास आघाडीची पत्रकार परिषद
३ एप्रिलला महाविकास आघाडीची मुंबईत शिवालयात पत्रकार परिषद होत आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते घटक पक्ष या पत्रकार परिषदेत उपस्थित राहणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. तर 31 तारखेला रामलीला मैदानावरती जी रॅली आहे. त्या महा रॅलीमध्ये महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे आणि शरद पवार उपस्थित राहणार असल्याचे ते म्हणाले.