ग्रामपंचायत निवडणुकीत धमक्या देणं योग्य नाही, संजय शिरसाठ यांचा नितेश राणे यांना सल्ला

| Updated on: Dec 12, 2022 | 8:59 PM

नितेश राणे यांना मी सांगेन. अशाप्रकारचं बोलू नका.

ग्रामपंचायत निवडणुकीत धमक्या देणं योग्य नाही, संजय शिरसाठ यांचा नितेश राणे यांना सल्ला
संजय शिरसाट
Follow us on

मुंबई : नितेश राणे यांच्यावर शिंदे गटाच्या संजय शिरसाठ यांनी टीका केली. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये धमक्या देणं योग्य नाही, असं संजय शिरसाठ म्हणाले. नितेश राणे आता मोठे नेते होण्याच्या मार्गावर आहेत. ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक राजकारण असतं. तिथं धमकी देणं योग्य नाही. आपण लोकांना जिंकायचं असतं. आपण लोकांना आपलसं करायचं असतं. तर ग्रामपंचयात आपोआप येते. अशा कुणाला दमदाट्या देऊन ग्रामपंचायत आणायच्या नसतात.

नितेश राणे यांना मी सांगेन. अशाप्रकारचं बोलू नका. त्यामुळं इतरांना असं वाटतं की, हे धमक्याचं देतात. असं आपल्याबद्दलचं चित्र होता कामा नये. नितेश राणे हे मोठे नेते होण्याच्या मार्गावर आहेत. अशी छोटी वक्तव्य त्यांनी करू नये, असा सल्ला संजय शिरसाठ यांनी नितेश राणे यांना दिला.

निर्भयाची एखादी गाडी गेली असेल, तर ती थांबली पाहिजे. आम्ही ती गाडी द्या, असं म्हणत नाही. संबंधित गाड्या या निर्भयासाठीच वापरली गेली पाहिजे, असंही संजय शिरसाठ यांनी स्पष्ट केलं.

त्यावेळी आम्हाला दम देत होते. हे कोणत्या रस्त्यानं जातात ते पाहू. आता हे कोणत्या रस्त्यानं जातात हेचं कळत नाही. दम देणे, लोकांना भडकवणे. आता यांच्यात दम राहिलेला नाही. हे बोलू शकत नाही, अशी टीकाही संजय शिरसाठ यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटावर केली.

अमित शाह यांना राज्यपाल कोश्यारी यांनी पत्र लिहिलं. गुलाबराव पाटील, संजय गायकवाड यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला. शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमान खपवून घेतला जाणार नाही, अशी आमची भूमिका होती. परंतु, आता त्यांनी पत्र लिहून कळविलं असेल, तर त्यांना समज दिली पाहिजे.