जागावाटपासाठी महायुतीच्या किती बैठका होणार? कोण किती जागा लढणार?; शिवसेनेच्या नेत्याने स्पष्टपणे सांगितलं

| Updated on: Jun 23, 2024 | 7:42 PM

Sanjay Shirsat on Mahayui Jagavatap : आगामी लोकसभा निवडणुकीत कोणता पक्ष किती जागा लढवणार? याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. महायुतीच्या जागावाटपावर शिंदे गटातील नेत्याने भाष्य केलं आहे. महायुतीच्या किती बैठका होऊ शकतात? यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. वाचा सविस्तर...

जागावाटपासाठी महायुतीच्या किती बैठका होणार? कोण किती जागा लढणार?; शिवसेनेच्या नेत्याने स्पष्टपणे सांगितलं
संजय शिरसाट
Follow us on

महायुतीच्या जागावाटपाची चुकीची माहिती समोर येत आहे. जागा वाटपाचा फॉर्मुला त्यांनी जरी ठरवला असला तरी देखील तो त्यांच्या अंतर्गत फॉर्मुला आहे. ज्यावेळी तीन मोठे नेते एकत्र बसतील. त्यावेळी फायनल फॉर्मुला ठरेल. असा फॉर्मुला वगैरे काही नसतं. प्रत्येकाने या निवडणुकीत आपण ताकद दाखवलेले त्यांनी पण दाखवली. आम्ही दाखवली आहे. त्यामुळे जेव्हा तीन मोठे नेते एकत्र बसतील. त्यावेळी या फॉर्मुलावर चर्चा होईल. तोपर्यंत हा फॉर्म्युला अंतिम समजला जाऊ शकत नाही, असं म्हणत शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी विधानसभे निवडणुकीच्या जागावाटपावर भाष्य केलं आहे.

जागावाटपासाठी किती बैठका होणार?

विधानसभेच्या जागावाटपासाठी किती बैठका होणार? यावर संजय शिरसाट यांनी भाष्य केलं आहे. तुमचा जागा वाटपाचा फॉर्मुला अजूनही ठरलेला नाहीये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार बसून यावर निर्णय घेतील. या निवडणुकीच्या जागावाटपासाठी चर्चेच्या 4 फेऱ्या होतील, असंही संजय शिरसाट यांनी सांगितलं आहे.

यावेळी निवडणुकीमध्ये आम्ही तिन्ही पक्ष जिंकण्याच्या ईर्शेने निवडणुकीत उतरणार आहोत. महायुती जास्तीत जास्त जागा कशी जिंकेल याकडे तिचा कल असणार आहे. सरकार आपली भूमिका मांडत आहे आणि योग्य पद्धतीने मराठ्यांना न्याय देण्यासाठी सरकार सकारात्मक कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता सरकार आरक्षण देईल, असंही संजय शिरसाटांनी म्हटलं आहे.

मंत्रिमंडळ विस्तारावर काय म्हणाले?

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा तर आहे. तर्कवितर्क लढवले जात आहेत. 24 -25 – 26 वेगवेगळ्या तारखा विस्तारासाठी देण्यात आल्यात. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जोपर्यंत ठरवत नाही. राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, असं शिरसाटांनी सांगितलं.

मनोज जरांगे पाटील यांना एवढंच सांगतो की, आम्ही कॅम्प घेऊन दाखले दिलेत. जर आम्हाला दाखले द्यायचेच नसते तर मग आम्ही कॅम्प घेतले कशाला असते? जे खऱ्या नंदी आहेत त्यांना आम्ही दाखले देतोय बोगस नोंदीवाल्यांना आम्ही दाखले देत नाही.विरोधी कारवाई सरकार करत आहे आणि सरकार गंभीर आहे. मुख्यमंत्री यांनी यावर आधीच भाष्य केलेलं आहे, असंही संजय शिरसाटांनी स्पष्ट केलं आहे.