श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार?, चर्चांना उधाण; संजय शिरसाट यांचं मोठं विधान

| Updated on: Nov 27, 2024 | 1:38 PM

Sanjay Shirsat on Shreekant Shinde : राज्यात मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरु आहे. अशात एकनाथ शिंदे यांनी देखील मुख्यमंत्रिपदावर दावा केलेला आहे, अशातच शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी याबाबत एक मोठं विधान केलं आहे. संजय शिरसाट यांनी काय म्हटलंय? वाचा सविस्तर...

श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार?, चर्चांना उधाण; संजय शिरसाट यांचं मोठं विधान
संजय शिरसाट, श्रीकांत शिंदे
Image Credit source: Facebook
Follow us on

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत सध्या खल सुरु आहे. भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. असं असतानाच एकनाथ शिंदे यांनी देखील मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. तर भाजपने मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात उपमुख्यमंत्रिपद किंवा केंद्रात मंत्रिपदाची ऑफर शिंदेंना दिल्याची माहिती आहे. या सगळ्यात जर शिंदे गटाने उपमुख्यमंत्रिपद घेण्याचं मान्य केलं. तर एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील अशी चर्चा रंगली आहे. यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते, आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. श्रीकांत शिंदे यांना राज्याच्या राजकारणात रस नाही. ते इथे येणार नाहीत. या बातम्या खोट्या आहेत, असं संजय शिरसाट म्हणालेत.

शिंदेंसोबतच्या भेटीवर प्रतिक्रिया

संजय शिरसाट हे एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी माध्यनमांशी संवाद साधला. मंत्रिपदासाठी कुठलीही लॉबिंग नाही. मी सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो होतो. मुख्यमंत्रिपदासाठी अद्याप कुणालाही फोन आलेला नाही. फोन कधी आणि कुणाला येणार हे अद्याप सांगता येणार नाही, असं शिरसाट म्हणालेत.

टायगर जब गुर्राता हैं तो…

टायगर मरा ही कब था?, सगळ्यांना माहीत आहे राज्यात टायगर जब गुर्राता हैं तो क्या होता हैं? भूचाल आत्ता हैं… हे भाजपलाही माहीत आहे त्यामुळे भाजप योग्य निर्णय घेईल. रावसाहेब दानवे यांच्या वकितव्याशी मी सहमत नाही. बहुतेक रावसाहेब दानवे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बातचीत केली असेल त्यांना त्यांनी काही सांगितलंय का ? हे पहावं लागेल, असं शिरसाटांनी म्हटलं आहे.

संजय राऊत याला आता काही काम राहीलंय का? जागा आल्या नाहीत, आत्ता हेच धंदे… संजय राऊतांनी आमची जास्त चिंता करू नये आम्ही सक्षम आहोत, त्यांनी सिल्वर ओकला जावं… कांग्रेस सोबत जाोून तुमचे काय हाल झाले ते पाहा.., असं म्हणत शिरसाटांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.