मुंबई : राज्यात कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी (Save Dharavi from flood this Monsoon) असलेल्या धारावी परिसर कोरोनाचे हॉटस्पॉट बनला आहे. पावसाळा सुरु होण्यास काही दिवस बाकी आहे. त्यामुळे धारावीत लवकरात लवकर मान्सूनपूर्व काम सुरु करा. कोरोनामुळे त्रस्त झालेल्या धारावीला पुरापासून वाचवा, अशी मागणी धारावी पुनर्विकास समितीने केली आहे.
धारावी पुनर्विकास समितीचे अध्यक्ष अॅड. राजू कोरडे यांनी याबाबतचे (Save Dharavi from flood this Monsoon) सविस्तर निवदेन मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांना दिलं आहे.
पावसाळा सुरु होण्यास अवघे काही दिवस बाकी आहेत. पावसाळ्यात धारावीत मोठ्या प्रमाणात पाणी साचतं. धारावी परिसर मोठ्या प्रमाणात पाणी साचते. धारावीच्या काही भागात तर पूरसदृश परिस्थिती असते. यावर्षी अशी परिस्थिती येऊ नये म्हणून या ठिकाणचे नाले योग्य प्रकारे साफ करणं आवश्यक आहे.
मात्र पावसाळा तोंडावर येऊनही अद्याप धारावीत मान्सून पूर्व कामाला सुरुवात झालेली नाही. या ठिकाणचे नाले अद्याप साफ केलेले नाही. या नाल्यातील गाळ सुकून इतका घट्ट झाला आहे की त्यावर जनावर चालतात. त्यामुळे जर धारावीत मान्सून पूर्व काम झाली नाही, तर मोठ्या प्रमाणात पाणी साचू शकते. आधीच धारावी कोरोनामुळे त्रस्त आहे. त्यात आता पाणी साचल्यास पावसाळी रोगराई मोठ्या प्रमाणात पसरू शकते.
त्यामुळे धारावीला आता पुरापासून वाचवा अशी मागणी धारावी पुनर्विकास समितीने केली आहे. याबाबतचे सविस्तर निवदेन मुंबई महापालिका आयुक्तांना दिलं आहे. त्यामुळे आता आयुक्त यावर काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार (Save Dharavi from flood this Monsoon) आहे.
#मुंबई – ‘मातोश्री’ समोर क्रेनमध्ये बिघाड झाल्याने मेट्रोचा भला मोठा गर्डर अडकला, गेल्या 24 तासांपासून क्रेन दुरुस्तीसाठी शर्थीचे प्रयत्न, म्हाडा कार्यालयासमोरील वळणावरर क्रेनचा भाग तुटला, बीकेसी तयार होऊन अन्य ठिकाणी नेताना गर्डरमध्ये बिघाड @dineshdukhande pic.twitter.com/9flsobPyhZ
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 26, 2020
संबंधित बातम्या :
नवी मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच, दिवसभरात 65 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
मुंबईतील कोरोना हॉटस्पॉटमध्ये रुग्णवाढीचा वेग मंदावला, कोणत्या वॉर्डात किती ?