लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शाळा सुरू होण्याकडे आस लावून बसलेल्या मुलांची प्रतीक्षा अखेर संपली असून, आजपासून राज्यभरातील शाळांचे दार उघडणार आहे. दोन दिवस स्वच्छता आणि कोरोना प्रतिबंधक जाईल. उपाययोजना केल्यानंतर १५ जूनपासून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाईल.
शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशांनुसार, 13 आणि 14 जून रोजी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून शाळेची स्वच्छता, सौंदर्यीकरण, कोरोना प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात. १५ जूनपासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत प्रवेश द्यावा. विदर्भातील तापमानाचा विचार करता तेथील शाळा २७ जूनपासून सुरू होतील; मात्र विद्यार्थ्यांना 29 जूनपासून शाळेत प्रवेश दिला
शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनी शालेय कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन मात्रा आणि बूस्टर डोस घेण्याबाबत विभाग स्तरावर आवश्यक कार्यवाही करावी
12 वर्षे आणि त्यापुढील वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण वाढविण्यावर भर द्यावा. शाळेचा परिसर आणि वर्गांत कोरोनाबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होईल, याची दक्षता घ्यावी. ताप किंवा कोविडसदृश लक्षणे असल्यास विद्यार्थ्याला शाळेत न पाठविण्याची सूचना पालकांना द्यावी. शाळेत उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये अशी लक्षणे आढळल्यास त्यांचे स्तरावर विलगीकरण करण्याची व्यवस्था करावी. शिवाय त्यांची तत्काळ चाचणी केली जावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.