डॉक्टर काय मतदारांची नाडी तपासणार का? निवडणूक आयोगावर राज ठाकरे कडाडले

| Updated on: Apr 09, 2024 | 8:24 PM

Raj Thackeray : लोकसभा निवडणूक 2024 ची हातघाई सुरु आहे. निवडणूक आयोगाने वेळापत्रक जाहीर केल्यानंतर असंख्य सरकारी कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाला जुंपले आहेत. त्याचा राज ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. त्यांनी निवडणूक आयोगाचे कान टोचले.

डॉक्टर काय मतदारांची नाडी तपासणार का? निवडणूक आयोगावर राज ठाकरे कडाडले
निवडणूक आयोगावर टीका
Follow us on

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या गलथान कारभाराचा खरपूस समाचार घेतला. निवडणूक घेण्याचे नियोजन अगोदर न केल्याने त्यांनी आयोगाची चांगलीच कान उघडणी केली. मुंबईत शिवतीर्थावर गुढीपाडव्याच्या मेळाव्यातून त्यांनी चौफेर फटकेबाजी केली. त्यांनी पहिलाच गोळा डागला तो निवडणूक आयोगावर. लोकसभेसाठी डॉक्टर, नर्स यांना सुद्धा जुंपल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी याबाबत आयोगाचे कान उघडले. तर डॉक्टर आणि नर्स यांनी त्यांचे काम करावे. तुम्हाला कोण नोकरीवरुन काढतो, तेच बघतो, असा दम त्यांनी दिला.

महापालिकेच्या निवडणूका केव्हा?

जवळपास पाच वर्षानंतर या खासकरून महाराष्ट्रात निवडणुका होत आहेत. महापालिकेच्या निवडणुका आता होतील आता होतील असं म्हणता म्हणता अजूनही होत नाही. त्यामुळे २०१९ला ज्या निवडणुका झाल्या. त्यानंतर आज २०२४ ला निवडणुका होत आहेत. त्यामुळे आचारसंहितावाले जागे झाले, असा टोला त्यांनी लगावला. महापालिकेच्या निवडणूका न झाल्याचे त्यांनी आवर्जून सूचित केले.

हे सुद्धा वाचा

तुम्हाला नोकरीवरून कोण काढतो ते बघतो

काल मी एक बातमी वाचली.निवडणुकीसाठी म्हणून महापालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सेसला निवडणुकीच्या कामावर जुंपवलंय. डॉक्टर काय मतदारांची नाडी बघणार. की नर्सेस मतदारांचे डायपर बदलणार. ज्या ठिकाणी नेमणूक केली आहे, तिथे ते नसावे का. निवडणुका होणार ही गोष्ट आयोगाला माहीत असते प्रत्येकाला. एक फळी का तयार करत नाही. दरवेळी नर्सेस डॉक्टर घ्यायचे हे कोणते उपदव्याप. आताच सांगतो डॉक्टर आणि नर्सेसने जाऊ नये. तुम्ही रुग्णालयात जा. काम करा. तुम्हाला नोकरीवरून कोण काढतं मी बघतो, असा दम त्यांनी प्रशासनाला दिला.

कुणाच्या हाताखाली काम नाही

आता माझ्या मनात विचार नाही. उद्या पाऊल उचललं तर स्वताचा पक्ष काढेन पण मी कुणाच्या हाताखाली काम करणार नाही. ही गोष्ट मी मनात खुणगाठ बांधली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाय कुणाच्या हाताखाली काम करणार नाही. तरीही एकाला संधी दिली होती, असा चिमटा त्यांनी काढला. पण त्यांनी स्वतःचा स्वतंत्र बाणा जोपासला.