मुंबई : मुंबईचा विकास म्हटलं की झाडांचा बळी हे नेहमीचं समीकरण बनलं आहे. विविध प्रकल्पांच्या नावाखाली वर्षानुवर्षे जुन्या झाडांची कत्तल केली जात आहे. नुकतंच वरळी शिवडी उन्नत मार्गात 452 झाडे बाधित होत आहेत. मात्र अनेक वृक्षप्रेमी संघटनांनी या वृक्षतोडीला विरोध केला आहे. त्यामुळे येत्या काळात हा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. (Sewri-Worli elevated corridor 452 trees cut down tree lover oppose this)
वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न
शिवडी येथून वरळीकडे थेट वाहतुकीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत शिवडी-वरळी उन्नत मार्गाचे काम हाती घेण्यात आले. हा प्रकल्प मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवरील वांद्रे-वरळी सागरी सेतू तसेच प्रस्तावित कोस्टल रोडला जोडला जाणार आहे. एमएमआरडीएकडून हा प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पाद्वारे वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
प्रकल्पासाठी 452 झाडांची कत्तल
मात्र या प्रकल्पासाठी 452 झाडांची कत्तल केली जाणार आहे. नुकतंच शिवडीपासून वरळीपर्यंत अनेक झाडांना पालिकेने नोटिसा चिटकवल्या आहेत. येत्या काही दिवसात ही झाडं तोडली जाणार आहेत. या वृक्षतोडीला अनेक वृक्षप्रेमी संघटनांनी विरोध केला आहे.
शिवडी-वरळी उन्नत मार्गाची थोडक्यात माहिती
उन्नत मार्ग वांद्रे-वरळी सी लिंक आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड या दोन महत्त्वाच्या मार्गाना जोडणार आहे. उन्नत मार्गामुळे शिवडी ते वरळी हे अंतर केवळ दहा मिनिटांत पार करता येणार आहे. शिवडी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडून उन्नत मार्गास सुरुवात होणार असून आचार्य दोंदे मार्ग, जगन्नाथ भातणकर मार्ग, ड्रेनेज चॅनेल रोड या मार्गावरून जात नारायण हर्डीकर मार्ग येथे समाप्त होईल. हा उन्नत मार्ग 4.51 किमी असून त्याला चार मार्गिका असणार आहे.
यात शिवडी रेल्वे स्थानक, मुंबई पोर्ट ट्रस्ट मार्ग आणि प्रभादेवी आणि परळ रेल्वे स्थानक येथे रेल्वे मार्गावर दुहेरी पूल असेल. त्यामुळे याची उंची 27 मीटर इतकी असेल. वरळी-शिवडी उन्नत मार्ग हा शहराला पूर्व-पश्चिम जोडणार आहे. तसेच वांद्रे-वरळी सागरी मार्ग, शिवडी-चिर्ले ट्रान्स हार्बर मार्ग या प्रकल्पांशी जोडणी असणार आहे.
या उन्नत मार्गाचे 1274 कोटी रुपयांचे कंत्राट गेल्या महिन्यात जे. कु मार इन्फ्रो प्रोजेक्ट्सला देण्यात आले आहे. येत्या तीन वर्षांत म्हणजे 2023 ला हे प्रोजेक्ट पूर्ण करण्याचे MMRDA चे उद्दिष्ट आहे.
मुंबई APMC मार्केटला वाहतूक कोंडीचा फटका; बाजारसमिती पाठोपाठ व्यापाऱ्यांची कोर्टात धाव https://t.co/1AJoiq8y9r #APMC #Market #NaviMumbai #Traffic
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 10, 2021
(Sewri-Worli elevated corridor 452 trees cut down tree lover oppose this)
संबंधित बातम्या :
ठाणे महापालिकेची धडक कारवाई, शहरातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा; एकाविरुद्ध गुन्हा दाखल
Mumbai Local Updates: कोरोना लसीकरण झालेल्या नागरिकांना लोकल ट्रेनने प्रवास करता येणार?