मुंबई : गेला काही दिवसात शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) हे भारतभर फेमस झाले. कारण त्यांचं काय झाडी काय डोंगर काय हॉटेल (Kay Zadi Kay Dongar Kay Hotel) या वाक्यानं धुमाकूळ घातला. शहाजी बापूंच्या प्रत्येक डायलॉगबाजी वर कमेंट आणि लाईकचा पाऊस पडत होता. सरकार स्थापन झालं, सत्ता स्थापन झाली. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री (Cm Eknath Shinde) पदाची शपथ घेतली. बापून पुढे ही इंटरव्युसाठी लाईन लागली. मात्र त्याच टायमाला दुसरीकडे मुंबईचा महाराष्ट्रात पाऊस पडत होता. या पावसाचा फटका महाराष्ट्रातील अनेक भागातील जनतेला तर बसलाच आहे. मात्र या पावसाचा फटका सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनाही बसला आहे. गुवाहाटीत चकाचक हॉटेलमध्या राहून आल्यानंतर आमदार निवसस्थानातील बापुंच्या रुमची अवस्था बघून तुम्हाला विश्वासही बसणार नाही की बापुंचीच रुम आहे का? बापूंच्या घराचा छत या पावसाळ्यात कोसळला आहे. मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातील हा प्रकार आहे. आमदार शहाजी बापू पाटील यांच्या रूम नंबर 312 मधील चेंबरच्या छताचा काही भाग कोसळल्याचे दिसून आले.
ही घटना काल संध्याकाळची आहे. यानंतर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने धाव घेतली आणि या छताची पाहणी केली त्यानंतर अधिकाऱ्यांनी दुरुस्तीसाठी रूम ही बंद केली. पावसाळ्यात अनेकांच्या घराची छता कोसळणं भिंती कोसळणं अशा अनेक घटना घडतात. काही वेळेला दुर्घटनाही घडतात आणि मनाला चटका लावून जातात. न विसरणाऱ्या जखमा अशा दुर्घटना देऊन जातात.
हा फटका सर्वसामान्यांसाठी नावा नाही. मात्र आता एवढे वर्ल्ड फेमस आमदार शहाजी बापू पाटील यांच्याच रूमच्या छताचा भाग कोसळल्याने अधिकाऱ्यांशी धावा धाव झाले आणि नेटकऱ्यांनाही कसं रिऍक्ट व्हावे हे कळेना.
बंडखोर आमदारांचा मुंबईतून सुरू झालेला प्रवास सुरत गुवाहाटी गोवा आणि पुन्हा मुंबई करत अखेर आपापल्या मतदारसंघापर्यंत गेला. यात बरीच नाव चर्चेत राहिली बऱ्याच आमदारांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केली. कुणाचे पुतळे जाळले, कुणाचे पोस्टर फाडले, विरोधात घोषणाबाजी झाली. मात्र या सगळ्या बंडात सगळ्यात जास्त चर्चेतलं नाव हे शहाजीबापू पाटलांचं राहिलं. त्यांचा बोलण्याचा रांगडा अंदाज हा नेटकरांना भावला. त्यामुळेच बापूंची एक ऑडिओ क्लिप बापूंना भारतभर फेमस करून गेली.
मात्र आमदारांचे अनेक कार्यकर्ते, गावाकडची लोक कामासाठी आमदार निवासात येऊन थांबतात. काम होईपर्यंत त्यांच्यासाठी आमदार निवास हाच त्यांचा निवार असतो. पण त्याच ठिकाणी जर अशा घटना घडू लागल्या तर या कार्यकर्त्यांची हीच चिंता वाढतेय. त्यामुळे अशा घटना पुन्हा घडून नये यासाठी पुरेशी खबरदारी घेण्यात यावी हीच अपेक्षा.