मुंबईः अभिनेता शाहरुख खानला (Actor Shahrukh Khan) कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे. या परिस्थितीत कोलकाताच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विटरवरुन त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. बॉलीवूडमधील अक्षय कुमारही (Akshay Kumar) गेल्या महिन्यात कोविड पॉझिटिव्ह आढळला होता. याशिवाय कार्तिक आर्यन आणि आदित्य रॉय कपूर हेदेखील कोविड पॉझिटिव्ह (Corona Positive) आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढला असल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या विळख्यात एकामागून एक कलाकार सापडत आहेत. त्यानंतर सुपरस्टार शाहरुख खान कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे वृत्त आहे.
Just came to know that our Brand Ambassador Shahrukh Khan has been detected covid positive. Pray fastest recovery for the superstar. Get well Shahrukh! Spring back asap!
— Mamata Banerjee (@MamataOfficial) June 5, 2022
शाहरुख खान कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट केले असून आत्ताच कळले की आमचा ब्रँड अॅम्बेसेडर शाहरुख खानला कोविडची लागण झाली आहे. तुम्ही लवकर बरे व्हाल अशी प्रार्थना करत आहे. शाहरुख लवकर बरा हो. असे त्यांनी ट्विट केले आहे.
अभिनेता कार्तिक आर्यन आणि आदित्य रॉय कपूर हे देखील शनिवारी कोविड पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले होते. गेल्या महिन्यात अक्षय कुमार कोविड पॉझिटिव्ह आला होता.
शाहरुख खानने नुकताच करण जोहरच्या पार्टीत हजेरी लावली होती. या पार्टीत त्यांच्यासोबत पत्नी गौरी खान आणि मोठा मुलगा आर्यनही होता. शाहरुख खान सध्या त्याच्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. त्याने 3 जून रोजी त्याच्या ‘जवान’ या नवीन चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. या चित्रपटात तो एका जखमी व्यक्तीच्या भूमिकेत दिसत असून शाहरुखने त्या जवानचे पोस्टर शेअर केले आहे. हा चित्रपट साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक अॅटली यांनी बनवला असून यामध्ये त्याच्यासोबत साऊथ अभिनेत्री नयनतारा दिसणार आहे.
शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाचीही चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. या पठाणमध्ये शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम दिसणार आहेत. पठाणचे शूटिंग बरेच दिवस चालले होते. कोरोनामुळे या चित्रपटाचे काम अनेकदा थांबले होते. जरी आता हा चित्रपट पूर्ण झाला आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानीबरोबर शाहरुख सध्या त्यांच्यासोबत काम करत आहे. ते दोघे मिळून डंकी नावाचा चित्रपट बनवत आहेत. या चित्रपटाची घोषणा काही दिवसापूर्वी झाली होती. चित्रपटांच्या या घोषणेनंतर सांगितले की, आपण हिराणीसोबत काम करण्यासाठी खूप आनंदी आणि उत्साहित आहे. शाहरुखचे सर्व चित्रपट 2023 मध्ये येणार आहेत.
शाहरुखने 2018 मध्ये शेवटचा चित्रपट केला होता. त्यावेळी त्याने आनंद एल रॉय यांच्या झिरो या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात अनुष्का शर्मा, मोहम्मद जीशान अयुब आणि कतरिना कैफ यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. आता शाहरुख तब्बल ५ वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतणार असून त्याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना आहे.