मुंबई: गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आजारपणामध्येही राजकारण बघणाऱ्या भाजप नेत्यांना फटकारलं आहे. दिल्ली भाजपच्या नवीन कुमार जिंदल या नेत्याने ट्विट करत शरद पवार यांच्या आजारपणाचा संबंध सचिन वाझे प्रकरणाशी जोडला होता. यावर शंभुराज देसाई यांनी आक्रमक होतं शरद पवार यांच्या आजारात ही भाजपच्या नेत्यांनी राजकारण करावे हे काही योग्य नाही, मला त्यांची कीव करावीशी वाटते, असं म्हटलं. (Shambhuraj Desai slams BJP leader who politicize Sharad Pawar health Problem)
लॉकडाऊन करण्याची राज्य सरकारची इच्छा नाही. मात्र, लोकांनी नियम पाळणे गरजेचे आहे. सरकार त्यासाठी सरकार पाऊल उचलत आहे, असं शंभुराज देसाई म्हणाले. लोकप्रतिनिधींनी जनतेच्या आरोग्याची काळजी करायची असते. पण जर तेच गर्दी गोळा करून नियम मोडणार असतील तर ते योग्य नाही. स्थानिक पोलिसांच्यावतीने इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
परमबीर सिंग यांच्या याचिकेवर कोर्टाचे नेमका काय आदेश आहे तो माझ्या पर्यंत अजून पोचलेला नाही. मात्र, परमबीर सिंग सुप्रीम कोर्टात ही गेले होते. त्यांना सुप्रीम कोर्टाने हायकोर्टात जाण्याचे आदेश दिले. प्रकरण न्याय प्रविष्ट असल्यामुळे जास्त भाषय करणे योग्य नाही, असंही शंभुराज देसाई म्हणाले.
नवीन कुमार जिंदल यांनी सोमवारी यासंदर्भात ट्विट केले होते. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, सचिन वाझे यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेला असं काय सांगितलं की, शरद पवार यांच्या पोटात इतक्या जोरात दुखायला लागले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. आता तर वाटते की, ‘दाल मे कुछ काला नही, पुरी दालही काली है’, असे नवीन कुमार जिंदल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच शरद पवार यांची ही पोटदुखी पाहता, पश्चिम बंगालच्या आधी महाराष्ट्रातच सत्तांतर होईल, असे वाटत असल्याची खोचक टिप्पणीही नवीन जिंदल यांनी केली.
ममता बॅनर्जी देशातील एकमेव महिला मुख्यमंत्री, हॅट्रीक साधणार की विकेट पडणार?; नंदीग्रामचे मतदार देणार कौलhttps://t.co/955zQ0lINm#MamtaBanerjee | #tmc | #bjp | #WestBengal | #WestBengalElection2021
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 31, 2021
संबंधित बातम्या :
शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान मोदींचा फोन
पवार-शहा भेट झालीच नाही, अफवांची धुळवड थांबवा; संजय राऊतांचं ट्विट
(Shambhuraj Desai slams BJP leader who politicize Sharad Pawar health Problem)