मुंबईः महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) सध्या राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. एकीकडे उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) स्वत: आजारी आणि त्यांची तब्बत साथ देत नसतानाही ते या राजकीय मैदानात उतरले आहेत, तरतर दुसरीकडे भाजप पक्षही सक्रिय झाला आहे. शरद पवार (NCP Leader Sharad Pawar) यांच्याबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दोन्ही पक्षातील नेत्यांबरोबर झालेल्या बैठकीत सरकारविषयी चर्चा झाल्यानंतरच ही रणनीती ठरवण्यात आली आहे.
बंडखोरीनंतर महाराष्ट्रातील राजकीय संकट आता अधिकाधिकच गडद होत चालले आहे. आज पाचव्या दिवशी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील राजकीय डावपेचांना आता वेग आला आहे.
त्याबरोबरच महाविकास आघाडी सरकारमधील मित्रपक्षांमध्ये बैठका सुरू झाल्या आहेत. कालच शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर सरकारवर आलेल्या या संकटाविषयी चर्चा करून पुढील रणनीती ठरविण्यात आली. याबैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनीच थेट शिवसेनेच्या नेतृत्वालाच अनेक सवाल उपस्थित केले आहेत.
या बैठकीत बंडखोरीवर ज्यावेळी सवाल करण्यात आले त्यावेळी शिवसेनेत एवढी मोठी बंडखोरी झाली तरी या गोष्टीची नेत्यांना कल्पना कशी नाही असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बैठकीप्रसंगी उपस्थित केला. शिवसेनेतून झालेली ही बंडखोरी धक्कादायक असल्याचेही सांगण्यात आले. त्याचवेळी काही बंडखोर आमदार आपल्या संपर्कात असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी सांगितले. बंडखोर आमदारांपैकी काही आमदार हे आपल्याला एसएमएस करत असून त्याद्वारे ते आपल्या संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले.बंडखोर आमदार मुंबईत आल्यावर पुन्हा संपर्क करून पाठिंबा देतील अशी आशाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
1. शिवसेनेतून एवढ्या मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होऊन शिवसेनेचे नेतृत्व या बंडखोरीबद्दल अनभिज्ञ कसे राहिले?
2. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’वरील बैठकीला उपस्थित राहूनही नंतर नेते बंड करून गुवाहाटीला गेले हे राजकीय संस्कृतील बाधक आहे.
3. एवढी मोठी बंडखोरी होऊनही तळागाळातील कार्यकर्त्यांकडून प्रतिसाद का आला नाही?
शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आपली बाजू राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या प्रश्नांना आणि आपली बाजूही यावेळी मांडली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीला बंडखोर आमदारापैकी काही आमदारांचाही विश्वास दिला होता.
1. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे ज्यावेळी आमच्याकडे आले त्यावेळी त्यांनी दोन मुद्दे मांडले होते. पहिला मुद्दा हा होता की, पुन्हा भाजपसोबत जाण्याचा आपण विचार करावा तर दुसरा मुद्दा हा होता की, निधी आणि इतर विकासाच्या मुद्यावर आमदारांच्याच काही तक्रारीही त्यांनी सांगितल्या. यावर त्यांना मी एकच सांगितले की, भाजपसोबत जाणे मला मान्य नाही, मात्र निधीच्या मुद्यावर आपण नक्की चर्चा करू.
2. यावेळी बैठकीला उद्धव ठाकरे यांनी फक्त सवाल जवाबच उपस्थित केले नाहीत तर बंडखोर आणि गुवाहाटीला गेलेल्या बंडखोर आमदारांबद्दलह त्यांनी संताप व्यक्त केला.
3. या बैठकीत त्यांनी सांगितले की, बंडखोर आमदार लवकरच महाराष्ट्रात येतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. त्यापैकी काही आमदार पुन्हा आपल्याकड परत येतील, तर काही बंडखोर आमदार आपल्याबरोबर एसएमएसद्वारे बोलत असून त्यांच्याबरोबरही संवाद चालू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीलाही सांगितले की, काही आमदार हे परत येतील अशी आशा आपल्याला आहे असा विश्वासही त्यांनी दिला आहे.
4.या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना सांगितले की बंडखोरीनंतर राज्यात कोणत्याही हिंसाचार किंवा हिंसात्मक निषेधाला विरोध दर्शवण्यात आला होता. यावेळी शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना कायदेशीर बाबींसह इतर गोष्टींविषयी विचार करण्याचा सल्ला दिला आहे.