मुंबई : वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या समर्थकांनी वाशिममधील पोहरादेवी गडावर (Pohradevi crowd) गर्दी केली होती. या शक्तिप्रदर्शनाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. (Sharad Pawar Angry Sanjay Rathod Poharadevi crowd)
संजय राठोड हे पहिल्यांदा माध्यमांसमोर आले होते. त्यामुळे गर्दी निर्माण झाली होती. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी नियम पाळा असे आवाहन केले होते. तर दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी उद्धव ठाकरेंकडे नाराजी व्यक्त केली. जर आपण जनतेसाठी एक नियम लावत असू, तर अशापद्धतीने नेत्याने समर्थकांची गर्दी करु नये, असे मत शरद पवारांनी मांडले. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गंभीर दखल घेत कारवाईचे आदेश दिले होते.
पोहरादेवी गर्दीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आज सकाळपासून झालेल्या गर्दीबाबत अनेक बातम्या माध्यमात आल्या आहेत. या सर्व बातम्यांची उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. कोविडच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी. तसेच वाशिम जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधिक्षक यांना याचा अहवाल द्यावा, अशा सूचना मुख्य सचिवांना दिल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश, संजय राठोड म्हणतात….https://t.co/nboMUYN229#CMUddhavThackeray #SanjayRathore #ShivSena #Yavatmal #Piharadevigad @SanjayDRathods @CMOMaharashtra @OfficeofUT
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 23, 2021
(Sharad Pawar Angry Sanjay Rathod Poharadevi crowd)
संबंधित बातम्या :
नियम सर्वांना सारखेच, पोहरादेवी गडावरील गर्दीबाबत कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश