मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) दोन वर्षांनंतर आज मंत्रालयात आले. त्यांनी विवध कामांचा आढावा घेतला. यावेळी प्रशासनाचे काम वेगवान करण्याच्या त्यांनी अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक बैठकही घेतली. मंत्रालयात त्यांनी विविध विभागांची पाहणीही केली. सुरूवातील त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या प्रतिमेला मुख्यमंत्र्यांनी पुष्पहार घातला आणि त्यांना नमन केले. गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे मुख्यमंत्री मातोश्री आणि वर्षा या निवासस्थानवरूनच राज्याचा कारभार पाहत होते. ज्या काही राजकीय आणि प्रशासकीय बैठका असतील, त्याही मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सवरूनच घेत असत. त्यानंतर त्यांची शस्त्रक्रिया झाल्याने काही दिवस ते घरूनच कारभार पाहत होते. मात्र आता ते त्यातूनही बरे झाले आहेत. त्यामुळे आज त्यांनी मंत्रालयात प्रत्यक्ष हजेरी लावली आहे. त्यावर शरद पवारांनी (Sharad Pawar) प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री दोन वर्षानंतर मंत्रालयात आले, याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारले असता, पवारांनी आज आले का? असा प्रतिप्रश्न केला. त्यावर पत्रकरांनी हो असे उत्तर दिले. लगेच पवारांनी हसत अरे वा…अशी प्रतिक्रिया दिली. तसेच त्यांच्या तब्येतीच्या कारणाने येत नव्हते. मी अनेक राज्यात बघतो. मुख्यमंत्री घरी बसूनच निर्णय घेतात. घरीही सचिवालय असते, तसं वर्षावरही आहे. त्यामुळ ते आले नाही आले तरी राज्याचा कारभार थांबला नाही. राज्याचा कारभार सुरू आहे. त्यांच्याकडे आलेल्या फाईल पूर्ण करतात. निर्णय घेतात. त्यामुळे त्याबाबतची चिंता माझ्या मनात नाही, असेही पवार म्हणाले. मध्यंतरी त्यांच्या आरोग्याच्या प्रश्नामुळे काही मर्यादा होत्या. त्या कमी झाल्या त्यामुळे ते आलेले दिसत आहेत, असे पवार म्हणाले.
मला असे कळले की, उपमुख्यमंत्री लोकांच्या कामला भरपूर वेळ देतात. अनेकांची जे प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे जाणारे असतात. ते उपमुख्यमंत्र्यांकडे वळतात. आणि माझी माहिती अशी आहे की त्यांची कामाची सुरूवात सकाळी सात-आठ वाजल्याापासून होते. असेही पवार म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या बाहेर न पडण्यावरून आणि त्यांच्या उपस्थितीवरून भाजपने टीकेची झोड उडवली होती. भाजप नेत्यांनी चार्ज दुसऱ्याकडे देण्याचे सल्लेही मुख्यमंत्र्यांना दिले होते. त्यावरून बरेच राजकारण रंगल्याचे दिसून आले होते. आता मुख्यमंत्री उपस्थिती कायम राहील आणि हा वाद संपेल ही अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.