मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. पवारांनी (Sharad Pawar) पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील कराडमध्ये पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे. अनेकांची घरं पडली आहेत, शेती उद्ध्वस्त झाली आहे. शरद पवारांनी स्वत: या भागात जाऊन पाहणी केली होती. त्यानंतर पवारांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन माहिती दिली.
शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडलेले मुद्दे
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांसह अन्य काही भागात अतिवृष्टी आणि त्यामुळे आलेल्या महापुराने नदीकाठावरील गावांमध्ये अभूतपूर्व अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली. या भागाचा दौरा केला असता पूरग्रस्तांनी माझ्याशी संवाद साधून आपल्या व्यथा तसेच मागण्या माझ्यासमोर मांडल्या.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 20, 2019
पूरग्रस्तांचं पीककर्ज माफ
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेऊन पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या मदतीची माहिती दिली. यानुसार पूरग्रस्तांचं 1 हेक्टरवरील पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे. शिवाय पडलेली घरं बांधून देण्यात येणार आहेत. बाधीत कुटुंबांना तीन महीने गहू आणि तांदूळ मोफत, तात्पुरत्या निवासासाठी ग्रामीण, शहरी भागात अनुक्रमे 24 आणि 36 हजार रुपये, घर बांधकामासाठी प्रत्येकी पाच ब्रास वाळू आणि मुरूम मोफत देणार, कृषी पंपाच्या वीज बिलाची वसुली तीन महिने स्थगित, जनावरांच्या गोठ्यांच्या नुकसान भरपाईपोटी अर्थसहाय्य, छोट्या व्यावसायिकांना 50 हजार रुपयांपर्यंत नुकसान भरपाई, अशी मदत देण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या
पूरग्रस्तांचं कर्ज माफ, 36 हजार घर भाडं, मुख्यमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा
शरद पवार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, पूरग्रस्तांच्या मदतीची आयडिया देणार