Sharad Pawar : याची कल्पना शिंदेंनाही नसावी, एकनाथ शिंदेंना लागलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या लॉटरीवर पवारांची पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Jun 30, 2022 | 8:48 PM

भाजपामध्ये दिल्लीचा आदेश आला किंवा नागपूरचा आदेश आला तर त्यात तडजोड नसते. त्यामुळे आदेश आला. त्याचा परिणाम मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर पडली, असे शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar : याची कल्पना शिंदेंनाही नसावी, एकनाथ शिंदेंना लागलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या लॉटरीवर पवारांची पहिली प्रतिक्रिया
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई/पुणे : भाजपात दिल्लीचा किंवा नागपूरचा आदेश पाळावा लागतो. गेले काही दिवस आसाम राज्यात आपल्या राज्यातील 39 विधानसभेचे सदस्य गेले होते. त्यात जी मागणी असावी ती मागणी एक तर राज्याच्या नेतृत्व बदलाची. त्यानंतर कुणाला तरी त्या पदावर काम करण्याची संधी मिळावी. पण जे आसाममध्ये सहकारी गेले. त्यांच्या अपेक्षा उपमुख्यमंत्र्यापेक्षा (Deputy Chief Minister) अधिक होत्या, असे वाटत नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली आहे. पण भाजपामध्ये दिल्लीचा आदेश आला किंवा नागपूरचा आदेश आला तर त्यात तडजोड नसते. त्यामुळे आदेश आला. त्याचा परिणाम मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर पडली. त्याची कल्पना कुणाला नव्हती. शिंदेंनाही कदाचित नसेल, असे शरद पवार म्हणाले.

‘फडणवीस खूश नाहीत’

देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदावर खूश नाहीत, हे त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवत होते, असे शरद पवार म्हणाले. जे मुख्यमंत्री होते. पाच वर्ष काम केले, नंतर विरोधी पक्षाचे नेतृत्व केले. त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली हा आश्चर्याचा धक्का होता. पण एकदा पक्षाने आदेश दिला, की सत्तेची कोणतीही संधी मिळाली तर ती स्वीकारायची असते. याचे उदाहरण फडणवीसांनी आज घालून दिले आहे. या दोन्ही गोष्टी आम्हाला कुणाला माहीत नव्हत्या. पण असे घडले आहे, असे शरद पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले शरद पवार?

‘साताऱ्याला लॉटरी लागली’

आताचे मुख्यमंत्री ठाण्याचे प्रतिनिधी आहेत. अनेक वर्ष ठाण्यात त्यांचे काम आहे. मूळ ते ठाण्याचे आहे. यशवंतराव चव्हाण हे पहिले मुख्यमंत्री सातारचे होते. त्यानंतर मी मुख्यमंत्री झालो. माझे मूळ गाव साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यात आहे. त्यानंतर बॅरिस्टर बाबासाहेब भोसले हे सातारा जिल्ह्यातील होते. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण हे साताऱ्याचे होते. आता ज्यांनी शपथ घेतली, तेही साताऱ्याचे आहे. त्यामुळे साताऱ्याला लॉटरी लागली, असे त्यांनी म्हटले आहे. तर आज एकनाथ शिंदे यांच्यावर जबाबदारी पडली आहे. त्यांच्याशी फोनवर बोलणे झाले. त्यांना शुभेच्छा दिल्या, असेही पवार म्हणाले.