मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज अनेक त्यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी त्यांच्याविषयी मत व्यक्त करताना म्हणाले की, शरद पवार यांच्याविषयी बोलताना प्रदीर्घ वेळ लागतो. मात्र यावेळी त्यांच्याविषयी दोन मिनिटात काय बोलणाल असा सवालही त्यांनी यावेळी केला.
तर यावेळी ते म्हणाले की, “शरद पवार म्हणजे एका वाक्यात जर सांगायचं असेल तर राजकारण,समाजकारण, विकास, संस्कृती, क्रीडा, शेती या सगळ्यांचं विद्यापीठ म्हणजे शरद पवार असा गौरवोद्गगारही त्यांनी यावेळी काढला.
फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा शरद पवार यांना कसा मिळाला हे सांगताना छगन भूजबळ यांनी त्यांच्या कौटुंबीक विचारांचाही वारसा सांगितला.
यावेळी ते म्हणाले की, फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा त्यांच्या घरातूनच त्यांना मिळाला होता.
कारण त्यांचे आई वडिल दोघंही सत्यशोधक विचारांचे पाईक होते. त्यामुळे शरद पवार यांच्या प्रत्येक विचारातून फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचे दर्शन होते असंही त्यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद यांच्यावर नेहमीच अनेकांकडून आरोप आणि टीका करण्यात आली. मात्र ते आरोप केले गेले असले तरी, कोणतेही आरोप सिद्ध झाले नाहीत. शरद पवार यांच्या आरोप झाले असले तरी त्यानंतर त्यांनी कधी बदला घेण्याचा विचार केला नाही असं मत मांडत असताना त्यांनी विरोधकांवरही टोला लगावला.
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार छगन भुजबळ यांनी बोलताना त्यांच्या राजकारण, समाजकारण, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील वावर आणि त्याविषयी दिलेले योगदान याविषयी छगन भुजबळ यांनी आपले मत मांडले.