मुंबई : राष्ट्रवादीच्या आमदारांनासोबत घेत अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा ठोकला असू घड्याळाच्या चिन्हावरच निवडणुका घेणार असल्याचं सांगितलं. एकंदिरत अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा ठोकल्यासारखंच आहे. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
दोन दिवसांपूर्वी देशाच्या पंतप्रधानांनी एक वक्तव्य केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल त्यांची विधानं होतं. त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या की राष्ट्रवादी पक्ष भ्रष्टाचारात सापडलेला पक्ष आहे. हे सांगत असताना त्यांनी राज्य सरकारची लँड याचा उल्लेख केला. त्याबरोबर सिंचनशी संबंधित काही तक्रार होती त्याबाबत उल्लेख केला. हा जो उल्लेख त्यांनी केला आणि राष्ट्रवादी पक्ष या भ्रष्टाचारात सहभागी आहे, असा उल्लेख केला. मला आनंद आहे की, आज मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही सहकाऱ्यांना त्यांनी शपथ दिली. याच मला आनंद असल्याचं शरद पवार म्हणाले.
माझं स्वच्छ मत असं आहे की, पक्षातील विधीमंडळाचे काही सदस्य यांनी कितपत वेगळी भूमिका घेतली या संबंधिचं चित्र आणखी दोन-तीन दिवसात लोकांसमोर येईल. याचं कारण ज्यांची नावं आली त्यातील काही लोकांनी माझ्याशी आजच संपर्क साधून आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि आमच्या सह्या घेतल्या पण आमची भूमिका वेगळी आहे आणि ती कायम आहे, याचा खुलासा त्यांनी केलेला आहे. पण याबाबतीत मी आताच काही बोलू इच्छित नाही. कारण याचं स्वच्छ चित्र माझ्या इतकंच त्यांनी जनतेच्या समोर मांडण्याची गरज आहे. ते त्यांनी मांडलं तर त्याबाबत वाद नसेल. मांडलं नाही तर त्यांनी वेगळी भूमिका घेतली असा निष्कर्ष मी काढणार असल्यांच पवार म्हणाले.
आता प्रश्न राहिला, पक्षाच्या भवितव्याबाबतचा. हा आजचा प्रकार इतरांना नवीन असेल, मला हा नवीन नाही. मला आठवतंय की १९८० साली निवडणुकीनंतर मी ज्या पक्षाचं नेतृ्त्व करत होतो त्या पक्षाचे ५८ आमदार निवडून आले होते. एक महिन्यानंतर त्या ५८ पैकी ६ सोडले सगळे माझा पक्ष सोडून गेलो. मी ५८ जणांचा विरोधी पक्षनेता होतो. पण त्यानंतर मी पाचच लोकांचा नेता राहिलो. मी ५ लोकांना घेऊन पक्ष बांधायला मी महाराष्ट्रात निघालो. त्यानंतर पाच वर्षांनी निवडणूक झाली त्यात दिसलं की आमची संख्या ६९ वर गेली म्हणजे संख्या वाढली गेल्याचं पवारांनी सांगितलं.