विमानाच्या टॉयलेटमध्ये तिने बाळाला जन्म दिला

| Updated on: Dec 14, 2022 | 4:46 PM

या महिलेला ती स्वत: प्रेग्नंट आहे हेच माहिती नव्हते. तिच्यासाठी आणि विमानकंपनीसाठी ही सरप्राईज डीलीव्हरी ठरली आहे.

विमानाच्या टॉयलेटमध्ये तिने बाळाला जन्म दिला
tamara
Image Credit source: tamara
Follow us on

नेदरलँड : केएलएम रॉयल डच एअरलाईनच्या विमानातून प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाच्या पोटात दुखू लागल्याने त्या विमानाच्या टॉयलेटमध्ये गेल्या आणि त्यांनी बाळा जन्म दिल्याची आश्चर्यकारक घटना घडली आहे. हजारो फूट उंचावरून उडणाऱ्या या विमानात सुदैवाने दोन डॉक्टर होते, त्यामुळे सुखरूपपणे या महिला प्रवाशाने एका गोंडस बाळाला जन्म दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

तमारा नावाची ही महिला प्रवासी गायुहक्वील-इक्वेडोर ते अॅमेस्टरडॅम प्रवास करीत असताना तिला विमान अर्ध्यात असतानाच पोटात दुखू लागल्याने ती टॉयलेटमध्ये गेली. आणि तिला प्रसवकळा सुरू झाल्या. यावेळी नेमके या विमानात दोन डॉक्टर आणि ऑस्ट्रीया येथील नर्स उपस्थित होते. त्यांनी बाका प्रसंग ओळखून या महिलेची सुखरूप प्रसूती पार पाडली आणि या महिलेने एका बाळाला जन्म दिला. या महिलेला आपण प्रेग्नंट आहोत हेच माहिती नव्हते. तिच्यासाठी आणि विमानकंपनीसाठी ही सरप्राईज डिलिव्हरी ठरली आहे.

या महिलेला तातडीने पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. नेदरलँड येथील हॉस्पिटलमध्ये या बाळाचे नाव तिने मॅक्सीमिलीआनो असे ठेवले आहे. ज्या प्रवाशाने तिला या कठीण प्रसंगी विमानात मदत केली त्या प्रवाशाचे नाव तिने आपल्या बाळाला दिले आहे.