मुंबईः एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंडखोरी करून शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केल्यापासून शिवसेनेच्या धनुष्यबाणासाठी न्यायालयीन लढा सुरू आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाणासाठीचा न्यायालयाचा अजून निकाल येणे बाकी असले तरी दोन्ही गटाकडून मात्र धनुष्यबाण हे चिन्ह आमचेचे असल्याचा दावा केला जात आहे. दोन्ही गटातील नेते, प्रवक्त्यांकडूनही धनुष्यबाण हे चिन्ह आपले कसे आहे हेच दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. शिंदे गटाकडून धनुष्यबाणावर दावा केला जात असला तरी आता न्यायालय काय निर्णय देणार त्याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे
शिवसेनेच्या धनुष्यबाणावर ज्या प्रमाणे ठाकरे गटाकडून दावा केला जात आहे. त्याच प्रमाणे शिंदे गटाकडूनही ठोस दावा केला जात आहे.
धनुष्यबाण हे चिन्ह आपल्यालाच कसं मिळणार हे सांगताना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी स्पष्ट शब्दात राजकीय गणित मांडून धनुष्यबाण हे चिन्ह आपल्यालाच कसं मिळणार हे सांगितले आहे.
लोकशाहीमध्ये बहुमताला प्राधान्य असते त्यामुळे हे चिन्ह म्हणून मान्यता मिळत असते. ती लोकप्रतिनिधी किती निवडून आले आहे.
किती आमदार, किती खासदार निवडून आले आहेत आणि त्यांनी किती मतं मिळाली आहेत. त्याचबरोबर आमच्याकडे 50 पैकी 40 आमदार आमच्यासोबत असल्याची माहितीही नरेश म्हस्के यांनी दिली आहे.
तर 18 पैकी 13 खासदार हे आमच्या गटाकडे असल्याने धनुष्यबाण हे चिन्ह आमच्या गटाचेच आहे असा विश्वास नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला आहे.
तर दुसरीकडे ठाकरे गटानेही धनुष्यबाणावर दावा केला आहे. ठाकरे गटाकडून आपल्या गटाने कागदोपत्री हे चिन्ह आपलेच कसे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.
मात्र शिंदे गटाने त्यांच्या टीका करत खोटे कागदपत्र सादर केल्याचे गुन्हे ठाकरे गटावर दाखल झाले असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
तर खरा पक्ष आमचाच आहे कारण बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पुढे घेऊन जाणार आमचा पक्ष असल्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह आम्हालाच मिळणार असल्याची खात्री नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली आहे.