उद्धव ठाकरे तुमचे पक्षासाठी योगदान काय?; शिंदे गटाच्या नेत्यानं उद्धव ठाकरे यांना असक्षम ठरवले…

| Updated on: Jan 29, 2023 | 10:25 PM

आगमी निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेवर बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचा भगवा झेंडा फडकवलाशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

उद्धव ठाकरे तुमचे पक्षासाठी योगदान काय?; शिंदे गटाच्या नेत्यानं उद्धव ठाकरे यांना असक्षम ठरवले...
Follow us on

मुंबईः राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये प्रचंड मोठा कलह माजला आहे. वेळोवेळी तो दोन्ही गटाच्या नेत्यांकडून बाहेर येत असला तरी आता थेट उद्धव ठाकरे यांच्यावर शिंदे गटाकडून निशाणा साधला जात आहे. त्यातच आज उद्धव साहेब ठाकरे यांच्या तीन नगरसेवकांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिंदे गटाने आणखी जोरदारपणे त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

याविषयी बोलताना रामदास कदम यांनी त्यांच्यावर टीका करताना म्हणाले की, ये तो झाकी है, अभी बहुत कुछ बाकी है असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

उद्धव ठाकरे आपल्या यांनी आपल्या भाषणामध्ये बोलत असताना पन्नास खोके असा उल्लेख करतात मात्र खुद्द उद्धव ठाकरे यांचीच खोके म्हणून ओळख असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

उद्धव ठाकरे यांच्यामुळेच शिवसेनेची बदनामी झाली आहे. तर 135 देशांमध्ये एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिलं की बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा असक्षम आहे असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे. तर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.

त्यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले की, एका बाईला आपल्या मागे लावले. ज्यांनी आमच्या देवांच्या विरोधात बोलत होती त्यांच्याकडून आमच्यावर टीका केला जात आहे.

रामदास कदम यांनी त्यांच्यावर टीका करताना म्हणाले की, उद्धव ठाकरे तुम्ही मातोश्रीच्या बाहेर पडत नव्हता. तर 25 वर्षे मुंबई महानगरपालिकेत तुम्ही सत्तेत होता तेव्हा तुम्ही काय केले असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
मुंबई आमच्या बापाची आहे तरीही आम्हाला मुंबई महानगरपालिकेत प्रवेश नव्हता.

आम्ही जेव्हा राजकारण करत होतो तेव्हा तुम्ही राजकरणात नव्हता. त्यामुळे तुमचे पक्षासाठी योगदान काय आहे असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांची गद्दारी केली आहे अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

आगमी निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेवर बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचा भगवा झेंडा फडकवलाशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

आज मराठी माणूस मुंबई सोडून बाहेर जात आहे. कोकणी माणसाने शिवसेना मोठी केली आहे. तरीही रामदास कदम यांना संपवण्याचा काम उद्धव ठाकरे यांनी केलं आहे असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.