मुंबईः सत्तेसाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीचे तळवे चाटले अशी टीका अमित शाह यांनी केली होती. त्यांच्या या टीकेनंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अमित शाह यांच्यावर टीका करताना त्यांची जीभ घसरल्यानंतर भाजपसह शिंदे गटातील नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली. संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांनी संजय राऊत यांना वेड्यात काढले आहे.
आमदार संजय शिरसाठ यांनी सांगितले की, या सरकारमुळे आता पहिल्यांदाच आग्रा येथे शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होते आहे. त्यामुळे साहजिकच त्याचा आम्हाला आनंद असल्याचे सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती साजरी करण्यासाठी अनेक मंत्री सोबत असणार असल्याचेही त्या्ंनी यावेळी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेली कामगिरी निभावल्यामुळेच संजय राऊत यांना वेगळी जबाबदारी सरकारमध्ये मिळाली होती असं म्हणते संजय शिरसाठ यांनी शरद पवार आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांच्या बेताल वक्तव्यामुळे संजय राऊत यांना शॉक देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
आजच्या काळात अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जात आहे. आजच्या काळात विमानातही शिवजयंती साजरी झाली आहे असा शब्दात त्यांनी शिवजयंतीबद्दल गौरवोद्गगार काढले.खा
सदार संजय राऊत यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानी एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केल्यानंतर संजय शिरसाठ यांनी राऊतांवर टीका करताना म्हणाले की, संजय राऊत हे वैफल्यग्रस्त झाले आहे. त्यामुळे त्यांना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचाराची गरज आहे असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथ विधी झाला होता, त्यावेळी तो सकाळचा शपथविधी संजय राऊत यांना माहीत होता. मात्र एकनाथ शिंदे याी त्यांच्या पार्श्वभागावर लाथ मारून मुख्यमंत्री पद घेतलं असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले.
त्यांच्यावर टीका करताना त्यांनी म्हणाले की, संजय राऊत हा कोण आहे, त्याला कोण विचारतेय, त्याने जी भाषा वापरली ती चुकीची असल्याचे सांगत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आम्ही करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आम्ही जेव्हा टीका करतो तेव्हा आमची जीभ घसरते असं म्हणू नका, नारायण राणे यांना जेलमध्ये टाकलं होते, याबाबत मुंक्यमंत्री निश्चित विचार करतील, याच्या थोबाडावर अंकुश लावावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. सध्याच्या काळात शिवसैनिक हे महत्वाचे नाहीत तर पैसा महत्वाचा आहे अशी जहरी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.