मुंबईः मुंबई- सूरत-गुवाहाटी-गोवा आणि पुन्हा मुंबई असा प्रवास करुन महाराष्ट्रात सत्तांतर केलेल्या शिंदे गटातील आमदार शहाजी बापू पाटील यांनी आज संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला. आम्ही ज्यावेळी बंडखोरी करून गुवाहाटीला गेलो त्यावेळी कामख्य़ा देवीला रेडा कापतात असं संजय राऊत यांनी वक्तव्य केलं होतं. त्याचा आज समाचार घेत शहाजी बापू पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर मातोश्रीचा रेडा म्हणून जोरदार टीका केली.
ज्या संजय राऊत यांनी आमच्यावर टीका केली की, चाळीस रेड्याचा कामाख्या देवीला बळी दिला जातो असं सांगितलं होतं मात्र आम्हाला तर तिथं कुठे रेड्याचा बळी देत असल्याचे आढळून आले नाही.
पण संजय राऊत यांना कुठून कळालं माहिती नाही. त्यामुळे संजय राऊत म्हणजे मातोश्रीनं सोडलेला वळू असल्याची टीका शहाजी बापू यांनी केली.
संजय राऊत म्हणजे मातोश्रीनं सोडलेला वळू आहे , रेडा आहे अशी सडकून टीका त्यांच्यावर केली आहे. त्यामुळे आता पुन्हा शिंदे-ठाकरे गटाचा वाद रंगणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. तुम्ही रेडा म्हणून हिणवू नका, कारण रेडा हा महाराष्ट्राचा देव आहे.
त्या रेड्यानेच ज्ञानेश्वरीचे वेद म्हटले आहेत अशी शब्दात त्यांनी त्यांच्यावर टीका केली. त्यामुळे रेड्याना तुम्ही शिव्या न देता त्याची पूजा करा आणि आमचीही पूजा करा असा टोलाही त्यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.