मुंबईः महाविकास आघाडीचे सरकार पायउतार झाल्यापासून खासदार संजय राऊत आणि ठाकरे गटाच्या नेत्यांना कामं नसल्यामुळेच त्यांनी शिंदे सरकारवर टीका करण्याचा इव्हेंट केला असल्याची निशाणा शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी साधला आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करत ते सध्या रिकामटेकडे असल्यानेच कर्नाटकातील न्यायालयाने समन्स दिल्यामुळे ते सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही म्हटले आहे.
शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत यांची सकाळ झाली की, साडे आठ वाजता त्यांचा भोंगा वाजतो, त्यावेळेपासून ते सरकारवर टीका करत असतात असा टोलाही त्यांना लगावण्यात आला आहे.
विरोधकांकडून आता शिंदे-फडणवीस सरकारवर टीका होत असली तरी महाविकास आघाडी सरकारच्या काळात ज्या लोकांनी महाराष्ट्र बंद पाडण्याचा घाट घातला.
ज्या सरकारमुळे गोवरचा प्रादूर्भाव झाला त्यांना शिंदे गटावर टीका करण्याच कोणताही अधिकार नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कर्नाटकातील एका न्यायालयाने खासदार संजय राऊत यांना समन्स बजावल्यानंतर त्यांना हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.
त्या प्रकरणावरूनही त्यांना छेडण्यात आले आहे. माझ्यावर फार मोठा अन्याय होतोय, मी लोकांसाठी भांडतोय, हे दाखवण्यासाठी आणि लोकांमध्ये भावनात्मक वातावरण तयार करण्यासाठी त्यांनी हा कर्नाटक सरकारचा एकमेव उद्योग संजय सुरू केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आ्हे.
संजय राऊत यांना काही कामं नाहीत, ते सध्या रिकामटेकडेच आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी उत्तर दिलेच पाहिज असं काही नाही असा जोरदार टोलाही त्यांच्यावर लगावण्यात आला.