मुंबई: कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ आज शिवसेनेने दादरच्या शिवाजी पार्कात जोरदार आंदोलन केलं. यावेळी कर्नाटक सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध करतानाच मावळ्यांना त्रास द्याल तर पंतप्रधानांच्या खुर्चीपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच भाजपला दिला आहे.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला. भाजप सरकारने त्रास देण्याचं काम सुरू केलं आहे. ईडी आणि पीडी लावली जात आहे. हिंमत असेल तर लावा ईडी. अनेकांना त्रास दिला जात आहे. जिवंत माणसांना त्रास देत आहात. तो सहन करतो. पण मावळ्यांना त्रास दिला तर पंतप्रधानांच्या खुर्चीपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला.
कर्नाटकातील लोकांप्रमाणेच केंद्र सरकार वागत आहे. कर्नाटक भारतातच आहे ना? मग पाकिस्तानात किंवा चीनमध्ये असल्यासारखे का वागत आहेत? असा सवाल त्यांनी केला. तसेच महाराष्ट्र पेटला आहे. वेळीच आवरा असा इशाराही त्यांनी दिला.
उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरेंनी मराठा आणि हिंदूंना एकवटलं होतं. त्यांचा मुलगा आज राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आहे. शिवसेनाही शिवाजी महाराजांचा वसा घेऊन जात आहे. देशाची आर्थिक नाडी मुंबईच्या हातात आहे. आम्हीही शांत बसणार नाही, असं त्या म्हणाल्या.
हिंदुस्थान चांगला बनवला तर तुमचे आभार मानू. पण पुतळ्याची विटंबना करणारी अवलाद तुमच्यात असेल तर त्याच्या गळ्याचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही. इतिहास बदलण्याचा प्रयत्न कराल तर भूगोल केल्याशिवाय राहणार नाही. कर्नाटक महाराष्ट्राची बॉर्डर आहे. तिथे शिवसैनिक तुमचा इतिहास बिघडवल्याशिवाय राहणार नाही. आमच्या वाघिणी फाडून टाकतीलच. पण या प्रकरणी संसदीय कारवाई व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली. कायद्याने कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
संबंधित बातम्या:
देशाच्या देवांचा अपमान होतो तरीही चंपा असो की डंफा कोणीच बोलत नाही; अरविंद सावंत यांचा घणाघाती हल्ला
VIDEO: छत्रपती शिवाजी महाराजजरा एसरन्नो अपमान माडवेडी; सदीप देशपांडेंचा थेट कानडीतून इशारा
देवेंद्र फडणवीसांकडून संयम शिकण्यासारखा, पंकजा मुंडेंकडून भरसभेत कौतुक; दरी मिटणार?