ठाकरे गटाचा शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात पार पडला जात आहे. या कार्यक्रमात ठाकरे गटाचे मुलुखमैदानी तोफ म्हणून ओळखले जाणाऱ्या संजय राऊत यांनी जोरदार भाषण केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपसह शिंदे गटावर निशाणा साधला. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटाच्या सुरू असलेल्या कार्यक्रमावरही टोला लगावला. आपण सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला नाही. पाहायचा असेल तर डोमकावळ्यांचा कार्यक्रम पाहू शकता. सत्तेची मस्ती चालणार नाही. बहुमताची दादागिरी चालणार नाही. तुमचा कधीही सत्यानाश होईल हा संदेश या निवडणुकीने दिल्याचं संजय राऊत म्हणाले.
महाभारताचं युद्ध संपलंय, पृथ्वीवर वाताहात झाली आहे. श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद सुरू आहे. श्रीकृष्णाने विश्वरुप दर्शन दिलं. पृथ्वीवर काय चाललंय ते दाखवलं. मोदी शहा, ईडी सीबीआय, फोडाफोडी घरफोडी हे बघून अर्जुन अस्वस्थ झाला. अर्जुन म्हणाला, हे असंच चालणार असेल तर हे जग तरणार तरी कुणाच्या खांद्यावर, कृष्णाने माझ्या खांद्यावर म्हटलं नाही. ते म्हणाले, चार माणसं या जगात आहे. ते जगाचा विचार करतात. कल्याणाचा विचार करतात, त्यांच्या खांद्यावर जग तरेल. त्या चार खांद्यांपैकी एक खांदा उद्धव ठाकरे यांच्याकडे असल्याचं राऊत म्हणाले.
रामाचा फोटो छोटा अयोध्येत. मोदींचाच फोटो मोठा. मी टीव्हीवर पाहिलं. आता मोदींना राम दिसला असता रामाने लाथ घातल्याने. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राने मोदींच्या हिंदुत्वाचा पराभव केला. कारण त्यांचं हिंदुत्व नकली होतं. त्यांना सट्टा लागला. पण हा शेवटचा आकडा आहे. हा सट्टाबाजार नेहमी तात्पुरता असतो. कधी कोसळतो, दिल्लीतही कोसळणार आणि महाराष्ट्रातही कोसळणार असल्याचं राऊत म्हणाले.