मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 25 युतीत सडली असा पुनरुच्चार केला. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता थेट भाजपलाच आव्हान दिलं आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स ही त्यांची चिलखतं आहेत. ही चिलखत काढून मैदानात या. नाय मातीत गाडलं, नाय लोळवलं तर नाव सांगणार नाही, असं आव्हानच संजय राऊत यांनी दिलं आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना हे आव्हान दिलं. ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स ही भाजपची शस्त्रं असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. याकडेही त्यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर राऊत यांनी भाजपला ओपन चॅलेंजच दिलं. अंगावरती वर्दी असेल पोलिसांच्या तर कुणाच्याही अंगावर जात असतो. बेकायदेशीर कामे करत असतात, आपण सिनेमात अशा प्रकारचे दृश्य पाहत असतो. तशी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स ही त्यांची चिलखत आहेत. ही चिलखत घालून ते लढत असतात. हिंमत असेल तर चिलखत काढून मैदानात या. नाय मातीत गाडलं, नाय लोळवलं तर आम्ही नाव सांगणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. त्याच्याशी आम्ही ठाम आहोत, असं राऊत म्हणाले.
आम्ही सगळेच लढत आहोत. आम्ही तुम्हाला घाबरत नाही. काय करणार आहात तुम्ही? खोट्या प्रकरणात तुरुंगात टाकाल, तुमचं आयटीफायटी सेल आहे, त्यातून बदनामी कराल किंवा हरेन पंड्यांप्रमाणे गोळी माराल. दुसरं तुम्ही काय करू शकता. तुम्ही शिवसेनेला खतम करू शकत नाही. हा डाव तुमच्यावर उलटेल, असा इशाराही त्यांनी दिला.
युतीत 25 वर्ष सडली हे उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा सांगितलं नाही. महाराष्ट्रता भाजपला जमिनीवरून आस्मानापर्यंत नेण्याचं काम आम्ही केलं आहे, हे सर्वांना माहीत आहे. आम्ही युतीचा धर्म पाळला याचा इतिहास साक्षी आहे. पण जे झालं ते झालं. उद्धव ठाकरेंनी आपलाी वेदना काल व्यक्त केली आहे. ती योग्य आहे. ही केवळ शिवसेनेची गोष्ट नाही. जेही भाजपसोबत चांगल्या मनाने गेले होते त्यांचे हेच हाल झाले. मग ते अकाली दल असो किंवा गोव्यात एमजीएम. हरयाणातही तेच झालं. चंद्राबाबू असो, जयललिता असो सर्वांना त्याची किंमत चुकवावी लागली आहे. शिवसेना एकमेव पक्ष आहे की ज्याने भाजपला किमत चुकवण्यास भाग पाडलं, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
संबोधित बातम्या:
राष्ट्रीय बालिका बालदिनः आपल्या राजकुमारीचे भविष्य करा सुरक्षित; या पाच योजनांमध्ये करा गुंतवणूक