Sheetal Mhatre | शीतल म्हात्रे ‘त्या’ व्हायरल व्हीडिओनंतर संतप्त, पत्रकार परिषद घेत म्हणाल्या…

| Updated on: Mar 12, 2023 | 7:41 PM

शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीत सामील झाले होते. या रॅलीतील व्हीडिओ मॉर्फ करुन तो व्हायरल करण्यात आला होता.

Sheetal Mhatre | शीतल म्हात्रे त्या व्हायरल व्हीडिओनंतर संतप्त, पत्रकार परिषद घेत म्हणाल्या...
Follow us on

मुंबई | शिवसेना पक्षाच्या नेत्या आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे या दोघांचा एक व्हीडिओ मॉर्फ करुन सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. या व्हीडिओवरुन गेल्या काही तासांपासून राजकारण चांगलंच तापलंय. या प्रकरणात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या अशा प्रकारानंतर शीतल म्हात्रे यांनी संताप व्यक्त केलाय. दरम्यान आता शीतल म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. या पत्रकार परिषदेत म्हात्रे यांच्यासह शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के उपस्थित होते.

शीतल म्हात्रे काय म्हणाल्या?

“स्त्री म्हणून आज वेदना होत्यात. आवडीपोटी राजकारणात आले. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना राजकारणात आले स्वत:ला सिद्ध केलं. ज्यानंतर निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा बाळासाहेबांचा विचार घेऊन निघालेल्या एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचं ठरवंल. गेल्या 8-9 महिन्यात ट्रोल केलं जात आहे, कमेंट केल्या जात आहेत. मात्र आम्ही आमच्या कामाकडे लक्ष देवून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र काल मागाठणे येथे प्रकाश सुर्वे यांच्या कार्यक्रमात आले होते. तेव्हा मॉर्फ करुन वाईट मेसेजसह व्हीडिओ तयार करण्यात आला. बोलण्यासारखं काहीही नसलं की चारित्र्यावर बोललं जातं”, अशा शब्दात म्हात्रे यांनी ठाकरे गटावर जोरदरा हल्लाबोल केला.

“हा व्हीडिओ ठाकरे गटाच्या अनेक फेसूबक पेजवरुन शेअर करण्यात आलं. बोलण्यासारखं काहीही नसलं की चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. शिंदेसोबत गेल्याने माझ्यावर गलिच्छ आरोप करण्यात आले. या व्हायरल व्हीडिओ संदर्भात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी 1 अंधेरीतील पदाधिकारी आणि दुसरा दहीसरमधील कार्यकर्ता आहे” अशी माहितीही म्हात्रे यांनी यावेळेस दिली. तसेच या सर्व प्रकारामागील मास्टरमाईंड कोण आहे, तो शोधून काढावा असं आवाहनही शीतल म्हात्रे यांनी पोलिसांनी केलं.

हे सुद्धा वाचा

ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर

दरम्यान शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटावर केलेल्या आरोपांवरुन ठाकरे गटाच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “आमचं नाव घेऊन प्रसिद्धी मिळवणं म्हणजे बेशरमपणा आहे” अशा शब्दात चतुर्वेदी यांनी म्हात्रे यांच्यावर टीका केली आहे.

“त्यांना वाटतं की आमच्याकडे काही उद्योग नाही. ज्यांनी स्वत:च नाव बदनाम केलंय. ज्यांनी 50 खोके खाऊन काम करतायेत. आम्ही त्यांच्यासाठी व्हीडिओ बनवणार?”, असा सवाल चतुर्वेदी यांनी उपस्थित केलाय.

आम्हाला स्वत:ची कामं आहेत. आमची कामं जनतेशी संबंधित आहेत. जनतेशी कामाशी आमची बांधिलकी आहे. तसेच जर असा व्हीडिओ व्हायरल झाला असेल, तर त्यासाठी सायबर सेल आहे. सायबर सेल त्यांची जबाबदारील पार पाडेल. पण आरोप करणं, राजकारण करणं, तसेच प्रसिद्धीसाठी दुसऱ्यांवर आरोप करणं हा बेशरमपणा आहे”, असं चतुर्वेदी म्हणाल्या.

नक्की प्रकरण काय?

दहिसरमध्ये रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या रॅलीसाठी आले होते. भूमिपूजन, उद्घाटन, रॅली आणि भाषण पार पडलं. एकूण 4.30 तास हा कार्यक्रम होता. आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे या रॅलीत सहभागी झाले होते. व्हीडिओ काढणाऱ्यांनी आपल्या सोयीच्या अँगलने व्हीडिओ काढला आणि एडीट केला. यावरुन सर्व राजकारण पेटलंय.